शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’ला अकॅडमिक अ‍ॅडव्हायजरी बोर्डाची भेट

By admin | Updated: January 14, 2017 23:45 IST

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या अकॅडमिक अ‍ॅडव्हायजरी बोर्डाने शनिवारी येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीला (जेडीआयईटी)

यवतमाळ : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या अकॅडमिक अ‍ॅडव्हायजरी बोर्डाने शनिवारी येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीला (जेडीआयईटी) भेट देऊन आढावा घेतला. यावेळी संस्थेची गुणवत्ता आणखी वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना बोर्डाने केल्या. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा आणखी वाढावा या हेतूने जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत या बोर्डाची नेमणूक करण्यात आली आहे. यात तंत्रशिक्षणात अग्रेसर जगविख्यात नामांकित संस्थांमधील संचालक तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या अ‍ॅडव्हायजरी बोर्डाची दुसरी बैठक शनिवारी ‘जेडीआयईटी’मध्ये पार पडली. एआयसीटीईचे माजी अध्यक्ष व आयआयटी मद्रासचे माजी संचालक डॉ. आर. नटराजन, आयआयएससी बंगळुरूचे डॉ.एन.सी. शिवप्रकाश, एलएनएम इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी जयपूरचे संचालक डॉ. एस. एस. गोखले, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ. बी.के. दत्ता, व्हीजेटीआय मुंबईचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांचा या बोर्डामध्ये समावेश आहे. यावेळी विजय दर्डा, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, सदस्य अशोक जैन, अनिल पारख, मोहन जोशी आदी उपस्थित होते. बोर्डाच्या सदस्यांनी महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती व विद्या शाखांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा, उपकरणांची पाहणी केली. विविध विद्या शाखा प्रमुखांनी आपल्या शंकांबाबत अ‍ॅडव्हायजरी बोर्डातील सदस्यांशी चर्चा केली. शंकांचे निरसन करताना अ‍ॅडव्हायजरी बोर्डातील सदस्यांनी संस्थेच्या आणखी प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना त्यांना केल्या. यावेळी मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाहनाचे प्रात्यक्षिक सदस्यांना दाखविण्यात आले. (वार्ताहर)