शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात कोकणात एसी डबल डेकर ‘हॉलिडे स्पेशल’

By admin | Updated: August 12, 2014 02:54 IST

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा यंदाचा प्रवास गारेगार होणार आहे. नवीन एसी डबल डेकर ट्रेनला ‘हॉलिडे स्पेशल’ ट्रेन म्हणून चालवण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे

मुंबई : गणेशोत्सवात कोकणवासीयांचा यंदाचा प्रवास गारेगार होणार आहे. नवीन एसी डबल डेकर ट्रेनला ‘हॉलिडे स्पेशल’ ट्रेन म्हणून चालवण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन गणेशोत्सवातच चालवण्यासाठी आता मध्य रेल्वेकडून जोरदार तयारी केली जात आहे. दहा डब्यांची आणि प्रत्येक डब्यात १२0 प्रवासी क्षमता असलेली एसी डबल डेकर ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. ही ट्रेन एलटीटी ते मडगाव अशी धावणार आहे. या ट्रेनच्या रेल्वेच्या आरडीएसओकडून चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यानंतर ट्रेन धावण्यास कुठलीही अडचण नसल्याचा अहवाल कोकण आणि मध्य रेल्वेला दिला होता. त्यानंतर हा अहवाल मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मात्र अहवाल सादर केल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी काही माहिती कोकण आणि मध्य रेल्वेकडे मागितली होती. ही माहिती दिल्यानंतर आयुक्त, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांची सीएसटी मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. यात रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेनला हॉलिडे स्पेशल ट्रेन म्हणून चालवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आयुक्त चेतन बक्षी यांनी त्याला मंजुरी दिली. याबाबत चेतन बक्षी यांनी सांगितले की, मध्य रेल्वेकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. त्याला हॉलिडे स्पेशल म्हणून मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवात ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठलीही अडचण नसल्यामुळे ती धावेलही. फक्त या ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल याची माहिती मागितली असून, तीदेखील मला मिळेल. एक अतिरिक्त शताब्दी विशेष ट्रेन कोकण आणि मध्य रेल्वेकडून चालवण्यात येत असून, तिच्या वेळेनुसार एसी डबल डेकर ट्रेन चालवण्यात येणार आहे. विशेष शताब्दी ट्रेनची वेळ ही सकाळी ५ वाजताची असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)