शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ताबांधणीचे सुमारे ४० कोटी पाण्यात

By admin | Updated: July 21, 2014 03:26 IST

शहरातील रस्त्याची पुनर्बांधणी व दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च करूनही पावसाळयात त्यांची चाळण झाली आहे.

उल्हासनगर : शहरातील रस्त्याची पुनर्बांधणी व दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च करूनही पावसाळयात त्यांची चाळण झाली आहे. महापालिका हद्दीतील बहुंताश रस्त्याची दुरस्ती व पुनर्बांधणी लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेला केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन पावसाळयात रत्यांची चाळणी होऊन रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त करून मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते हिराघाट रस्ता, भंगार गल्ली रस्ता, राधास्वामी संत्सग ते सेक्शन रस्ता, भाटिया चौक ते कालिका मंदिर रस्ता, फॉरवर्ड लाइन ते टॉऊन हॉल रस्ता, गणेश नगर रस्ता, टँकर पाणी पॉइंट रस्ता, व्हिनस चौक ते मार्यानगरी रस्ता आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत़ पालिकेचे क्षेत्रफळ जेमतेम १३ किमी असून शहरातील रस्ता बांधणी व दुरुस्तीवर खासदार निधी, आमदार निधी, महापौर व स्थायी समिती सभापती निधी, नगरसेवक निधी खर्च होत आहे. आदीच्या निधीच्या खर्चानंतरही महापालिका दरवर्षी रस्ता बांधणीवर ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करीत आहे. दरवर्षी कोट्यवधीचा निधी फक्त रस्त्याच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीवर खर्च होऊनही त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील गाऊन मार्केटमधील रस्ता, हिराघाट रस्ता, नेताजी चौक ते व्हिनस चौक रस्ता, काली माता चौक ते गणेश नगर रस्ता एका वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. एका वर्षात या काँक्रिट रस्त्याची स्थिती डांबरी रस्त्यासारखी झाली आहे. पालिका अशा ठेकेदारावर काहीएक कारवाई करीत नसल्याने पालिकेवर टीका होत आहे. (प्रतिनिधी)