शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करणारी डॉक्टरच भरारी पथकात!

By admin | Updated: May 28, 2017 00:53 IST

जिन्सी रोडवर खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्राचा पोलिसांनी २४ मे रोजी छापा टाकून मुख्य सूत्रधार डॉ. चंद्रकला गायकवाडला अटक केली. डॉ. गायकवाड

- लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : जिन्सी रोडवर खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्राचा पोलिसांनी २४ मे रोजी छापा टाकून मुख्य सूत्रधार डॉ. चंद्रकला गायकवाडला अटक केली. डॉ. गायकवाड मागील एक वर्षापासून महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर म्हणून कार्यरत होती. अलीकडेच महापालिकेने गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यासाठी पथक नेमले. त्यातही तिचा समावेश होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.गायकवाडने महापालिकेत ३० वर्षांहून अधिक सेवा केली. आरोग्य विभागात असताना तिने बहुतांश सेवा जिन्सी परिसरातील आरोग्य केंद्रातच घालविली. २०१३ मध्ये ती निवृत्त झाली. १५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत शहरात धडक मोहीम राबवून सर्व प्रसूती रुग्णालयांची, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने वेगवेगळी पथके स्थापन केली होती. डॉ. अंजली पाथ्रीकर यांच्या पथकात डॉ. चंद्रकला गायकवाडचाही समावेश होता. तिनेही शहरातील गर्भपात केंद्रांची तपासणी केली. ही सर्व तपासणी सुरू असताना डॉ. गायकवाडचे अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू असेल, असा संशय आला नाही.