पुणो : बॉम्बच्या अफवेने पुणो रेल्वे स्थानक आज हादरून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास एका मोबाईलवरून आलेल्या निनावी कॉलमुळे पोलिसांची धावपळ उडाली. संपूर्ण रेल्वेस्थानक रिकामे करण्यात आले. संपूर्ण स्थानकाच्या तपासणीनंतर ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वानी नि:श्वास सोडला. तब्बल अडीच तास संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती.
काही आठवडय़ांपूर्वीच फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर बॉम्बस्फोट घडल्याची घटना ताजी आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुणो पोलिसांना नियंत्रण कक्षात एका मोबाईलवरून रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आला. नियंत्रण कक्षातून तातडीने रेल्वे स्थानक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला कळविले. तोर्पयत रेल्वे पोलिसांनी स्थानकातील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानकात केवळ दौंड पॅसेंजर उभी होती. तर पुणो-पटना एक्स्प्रेसला यार्डातच थांबवून ठेवण्यात आले. स्थानकातील सातही फलाटांवरील प्रवाशांना बाहेर पडण्याची सूचना देण्यात आली. बॉम्ब असल्याची माहिती कळताच प्रवाशांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. हळूहळू रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले. तोर्पयत ‘बीडीडीएस’चे पथक दाखल झाले होते. श्वानपथकातील दोघा श्वानांच्या मदतीने स्थानकावर उभ्या असलेल्या सर्व गाडय़ांची तपासणी केली. (प्रतिनिधी)
रेल्वे पोलीस व ‘बीडीडीएस’चे कर्मचारी स्थानकातील प्रत्येक फलाट, रेल्वे ट्रॅक पिंजून काढतात. रेल्वे स्थानकाचा परिसर व पार्किगचीही पाहणी करतात. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दीड तासांच्या तपासणी मोहिमेनंतर केवळ बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर प्रवाशांना स्थानकात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, या अफवेमुळे पुणो-पटना एक्स्प्रेससह काही गाडय़ांना विलंब झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यानच्या काळात पुणो रेल्वे स्थानकावर येणा:या गाडय़ा शिवाजीनगर, खडकी व हडपसर येथे थांबवून ठेवल्या होत्या.