शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीजवळ गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड

By admin | Updated: August 22, 2016 02:41 IST

एपीएमसीच्या धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे.

नवी मुंबई : एपीएमसीच्या धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. तब्बल ६ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोमीन मोफीस खान व बादशहा इफाजल शेख या दोघांचा समावेश आहे. दोघेही आरोपी कळवा येथील शांतीनगर मोफतलाल इंडस्ट्री, जाकीर किराणा स्टोअर्सजवळील झोपडपट्टीतील आहेत. नवी मुंबईमध्ये खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते. या स्टिंग आॅपरेशनची दखल घेवून अमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस स्टेशन स्तरावर शोध मोहीम सुरू केली आहे. एपीएमसीजवळील युनियन बँकेच्या कंपाऊंडजवळच्या झोपडपट्टीमध्ये १९ आॅगस्टला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन जण गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकली. तेथे विक्रीसाठी आणलेला ६ किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ६१ हजार रूपये होत आहे. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा १९८८ चे कलम ८ (क) २०, २२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गत एक महिन्यामध्ये पोलिसांनी नेरूळमधून एका आरोपीला अटक केली आहे. एपीएमसीमध्ये गांजा ओढणारा, विकणाऱ्या व गांजाचे रोपे लावणाऱ्यांना अटक केली आहे. यापूर्वी गांजा व इतर अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनाही ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी एक महिन्यात टाकलेल्या धाडीमध्ये पहिल्यांदा १ किलो गांजा सापडला आहे. या गुन्ह्यामध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, आरोपींना गांजा कोण पुरवत होते याची माहितीही पोलीस घेत आहेत. धान्य मार्केटसमोरील या झोपडपट्टीमध्ये कराळे नावाची महिला व तिच्या कुटुंबातील इतर सदस्य गांजाची विक्री करत होते. यामुळे एकावर कारवाई झाली तर दुसरे तो व्यवसाय करू लागतात अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत हा अड्डा कधीच बंद झाला नाही. या कुटुंबात जवळपास २४ जण आहेत. पोलिसांच्या धाडसत्रामुळे हा अड्डा पहिल्यांदा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. >राजेंद्र गलांडेंचा धडाका एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. यापूर्वीही गलांडे यांची नियुक्ती असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई केली होती. एपीएमसीमध्येही त्यांनी केलेल्या कारवाईमुळे या परिसरातील सर्व अवैध व्यवसाय बंद होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.