शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के बीपीएड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 13, 2016 18:50 IST

दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि कमी विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे 100 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 13 - दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि कमी विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे 100 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनानेही राज्यातील केवळ नऊ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी संख्या रोडावत चालली आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्याने तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शारीरिक शिक्षक पदे रद्द केल्याचा हा परिणाम असल्याचा आक्षेप एकीकडे घेतला जात असतानाच राज्य सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रात विनाअनुदानित तत्त्वावर चाललेल्या शिक्षणाच्या धंद्यालाही लगाम बसणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. राज्यातील बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी यंदा सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येत आहे. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. राज्यातील सुमारे शंभर महाविद्यालयांत १० हजार पटसंख्या आहे. मात्र, यंदा सीईटीसाठी केवळ १३८० अर्ज आल्याची माहिती मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा म्हटले तरी केवळ नऊ ते दहा महाविद्यालयेच चालू शकतात. शिवाय राज्य सरकारने राज्यात केवळ नऊ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने उर्वरित महाविद्यालयांना बी.पी.एड. अभ्यासक्रम बंद करण्याशिवाय मार्गच उरला नाही. राज्य सरकारने केवळ नऊ महाविद्यालयांना नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने उर्वरित नव्वद टक्के अभ्यासक्रम बंद करणार आहेत का, असा सवाल बी. पी. एड. महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून केला जात आहे. त्याच वेळी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या राज्यांतील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळी प्रवेश देऊन अनेक संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि मैदाने नसतानाही अशी महाविद्यालये चालत असल्याचे चित्र आहे. नाहरकत प्रमाणपत्र दिलेली महाविद्यालयेचंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विशुद्ध महाविद्यालय यवतमाळ यांचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे महाविद्यालय (सर्व अमरावती), मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे महाविद्यालय, औरंगाबाद, नवगण शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, बीड, बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशनचे कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन, मुंबई, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय, बार्शी (जि. सोलापूर), क्रीडा मंडळ नागपूरचे महाविद्यालय, धंतोली, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमाननगर (दोन्ही नागपूर), एम. पी. एड. साठी गर्दीदोन वर्षाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमासाठी मात्र उलट स्थिती आहे. राज्यभरातील तीस महाविद्यालयांमध्ये एम.पी. एड, अभ्यासक्रमाच्या ३५० जागा आहेत. तर प्रवेशासाठी आठशेच्या वर ार्थी संख्या आहे. यामुळे एम. पी. एड. साठी राज्यात चांगली स्थिती असल्याचे दिसते.