शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

९00 भाविकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Updated: July 3, 2014 22:55 IST

खामगाव-पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी सुमारे ९00 भाविक प्रवाश्यांना घेऊन दुपारी ४.३0 वाजता पंढरपूरकडे रवाना झाली.

खामगाव : रेल्वे स्थानक येथून आज खामगाव-पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी सुमारे ९00 भाविक प्रवाश्यांना घेऊन दुपारी ४.३0 वाजता पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी एक्सप्रेसला झेंडी दाखविली. सलग १२ व्या वर्षी येथून आषाढ वारीला रेल्वेने जाण्यासाठी आज सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. तर तिकिट काढण्यासाठी सुध्दा दुपारपर्यंत रांग लागली होती. यावर्षी येथून ६ जनरल व १ आरक्षित व एक एसएलआर अशा ८ बोग्या होत्या. यामधून ५८५ तिकीट विक्री होवून सुमारे ९00 भाविक पंढरपूरला रवाना झाले. तर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची दुसरी फेरी उद्या ४ जुलै नंतर तिसरी ६ व चौथी ७ जुलै रोजी येथून रवाना होणार आहे. या एक्सप्रेसला अमरावती येथून आलेल्या ८ बोग्या जलंब स्टेशनवर जोडल्यानंतर ही १६ बोग्यांची एक्सप्रेस जलंब येथून निघणार आहे. आज खामगाव येथून पहिल्या फेरीपासून रेल्वेला सुमारे १ लाख २५ हजाराचे उत्पन्न येथील स्थानकावरुन मिळाले. यासाठी रेल्वे स्थानक प्रबंधक सुभाष वरुडकर, संजय भगत, अजय गोहे, यामीन, चेतन फडणीस, सोनाजी तेलगोटे, इंदिराबाई ठाकूर, उमाबाई ढोरे, संजीवनीबाई इंगळे, स्नेहल सोनोने, प्रशांत हिंगे आदींनी प्रयत्न केले. सदर एक्सप्रेस रवाना होण्यापूर्वी आ.दिलीपकुमार सानंदा, जि.प. अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे व न.प. काँग्रेस पक्षनेता अशोककुमार सानंदा यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे तसेच एक्सप्रेसचे पूजन केले. एक्सप्रेसचालक ए.के.गोहरे व गार्ड एम.बी.परदेशी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आ.सानंदा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही एक्सप्रेस रवाना झाली. यावेळी न.प.उपाध्यक्ष संतोष देशमुख, जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य सुरेश वनारे, सौ.सरस्वती खाचणे यांची उपस्थिती होती. यावेळी हरिओम ग्रुपकडून भाविकांना फराळी चिवडा वितरण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंजाजी टिकार व इतरांनी औषधीचे वाटप केले.