शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून ८७ कोटींची कामे

By admin | Updated: October 16, 2016 02:20 IST

गेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच

- व्यंकटेश वैष्णव,  बीडगेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाही धावून आल्या. सिंचनाची मोठी कामे हाती घेण्यात आली. मागील दीड वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून जिल्ह्यात ८७ कोटींची कामे झालेली आहेत. गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाझर तलाव, लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्याला आता दोन वर्षे पाण्याची चिंता नाही.सुरुवातीला बिंदूसरा प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पुढाकार घेत सर्व सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने या मोहिमेला बळ दिले. यानंतर नाम फाउंडेशन, जैन संघटना, मानवलोक यासह विविध संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. गावातील नागरिकदेखील गाळ काढण्याच्या कामासाठी एकवटले. यातून पाझर तलाव, लघु प्रकल्प व मध्यम प्रकल्पातील १२५ लाख घनमीटर गाळ काढला. यासाठी शासनाने निविदा काढल्या असत्या तर अंदाजित ६२.५० कोटी रुपयांचा खर्च झाला असता. ६८ कामे लोकसहभागातून झाली आहेत. नदी रुंदीकरण खोलीकरण काम पूर्णबीड तालुक्यातील लोळदगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहयोगातून नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे मोठे काम पूर्ण झाले आहे. बिंदूसरा नदी पात्रावर हे काम असल्याने सद्य:स्थितीत मोठा जलसाठा झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम मानवलोकच्या माध्यमातून झाले. अभिनेता आमीर खान याने पुढाकार घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील वॉटर कप स्पर्धा घेऊन राडीतांडा व खापरटोन येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे केली.बीडसारख्या ठिकाणी लोकसहभागातून कामे होत नसतात, असे म्हटले जात होते. मात्र झालेली सिंचनाची कामे पाहता कार्य संस्कृती बदलाचे प्रतीक म्हणून या कामांकडे पाहावे लागेल. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी बीड