शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कृष्णजन्माष्टमीची ८६ वर्षांची परंपरा

By admin | Updated: August 25, 2016 02:57 IST

गेल्या ८६ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात.

नेरळ : गेल्या ८६ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची ४ थी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवात गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरु ण मंडळी, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्याने हजेरी लावतात.गोपाळकाला उत्सवाबाबत गावातील बुजुर्ग मंडळींच्या माहितीनुसार आणि राऊत कुटुंबीयांच्या घरातील सुशीला महादू राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्या या घरात सून म्हणून येण्यापूर्वीपासून हा उत्सव होत असल्याचे सांगतात. त्यांचे सासरे गोपाळ वाळकू राऊत हे गणेशोत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन उल्हास नदीच्या पात्रात केल्यानंतर मूठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर अशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेवून पूजाविधी केला. पुढे जन्माष्टमीचा उत्सव सुरु झाला. आज या उत्सवाला ८६ वर्षे पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले.जन्माष्टमीच्यादिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीचा पूजाविधी केला जातो व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात. दिवसभर भजन, हरिपाठ व रात्री आरती झाल्यावर कृष्णपाळणा म्हटला जातो. यावेळी दहीपोह्यांची उधळण करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दांपत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे या उत्सवात बाळगोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दांपत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडली जाते. (वार्ताहर) >पाळणा हलविण्याची प्रथाउत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दांपत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे या उत्सवात बाळगोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दांपत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात.