शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पन्हळघर निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान

By admin | Updated: August 25, 2016 02:52 IST

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे ८५ टक्के, तर मेढा, साजगाव, पोशिर, शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे ८५ टक्के, तर मेढा, साजगाव, पोशिर, शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतमोजणी २६ आॅगस्टला, तर निवडणुकीचा निकाल हा २९ आॅगस्ट रोजी लागणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.जिल्ह्यातील आठ विविध मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही मिळून १२ जागांसाठी २४ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रात बंद झाले. मतदानासाठी सकाळी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास मतदार कमी संख्येने बाहेर पडले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पन्हळघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान झाले होते, तर पोटनिवडणुकीसाठी ६१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमधील सात जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते.जिल्ह्यातील विविध ८१ ग्रामपंचायतीमधील १३२ जागांसाठी पोटनिवडणूक होणार होती.(प्रतिनिधी)वडखळ : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशी येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील एका रिक्त झालेल्या जागेसाठी बुधवारी निवडणूक शांततेने पार पडली. ५९ टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक अधिकारी पी.आर.पाटील यांनी दिली. दोन उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत राजेंद्र थवई व सतीश म्हात्रे रिंगणात उभे होते. वॉर्ड क्र. ३ मधील एकूण १०४७ मतदारांपैकी ६१७ मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता.