शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील ८१६ सिंचन विहिरी रद्द

By admin | Updated: June 30, 2016 00:11 IST

उपमुकाअ यांनी दिलेल्या अहवालात निधीचे नियमबाहय़ पद्धतीने वाटप झाल्याचा ठपका.

राजेश शेगोकार/ अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सिंचनासाठी विहिरी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना दिलेले निकष पूर्ण केले नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यात मंजूर केलेल्या ८१६ सिंचन विहिरी रद्द करण्याची शिफारस पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी अहवालात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण तालुक्यातील विहिरी रद्द होण्याचा हा विदर्भातील पहिलाच प्रकार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. तीन लाख रुपये एका विहिरीसाठी अनुदान मिळत असल्याने शेतकर्‍यांसाठी ही योजना संजीवनी देणारी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थींची निवड करताना शासनाने लाभार्थींचा प्राधान्यक्रम दिला आहे. प्रत्येक गावासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार विहिरींचा लक्ष्यांक दिला आहे. या लक्ष्यांकानुसारच विहिरींचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा आहे. मूर्तिजापूर तालुक्यात ८१६ सिंचन विहिरी मंजूर करताना यामधील एकही निकष पाळल्या गेलेला नाही. ग्रामसभेने सिंचन विहिरी मंजूर करण्यासाठी निवडलेल्या लाभार्थींच्या यादीमध्ये असलेला प्राधान्यक्रमही तत्कालिन गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी बदलवून टाकला आहे. तालुक्याला दिलेले लक्ष्यांक पूर्ण करताना येथील अधिकार्‍यांनी गावनिहाय लक्ष्यांकाचे भान ठेवलेले नसल्याने सिंचन विहीर देण्यामागचा शासनाचा उद्देशच धोक्यात आला आहे.