शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

5 मित्रांसाठी 'त्यानं' केली 8 वर्षांनंतर आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2016 22:49 IST

5 मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत सतत अस्वस्थ असणाऱ्या पित्याने 'हाय-वे'वर त्याच ठिकाणी जाऊन आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत

शिरवळ ( सातारा ), दि. 28 - आठ वर्षांपूर्वी आपल्या आजारी मुलाला दवाखान्यात पाहायला येताना 5 मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत सतत अस्वस्थ असणाऱ्या पित्याने 'हाय-वे'वर त्याच ठिकाणी जाऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी खंबाटकी घाटात घडली.'ही दोस्ती तुटायची नाय...' हे चित्रपटातील बोल आठवावेत, असा हा प्रकार. वसंत महादेव शिंदे ( वय 46, सध्या रा. पेटकर कॉलनी, रविवार पेठ वाई, मूळ रा. कार्वे ता.माळवा जि.सांगली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. शिंदे हे वाईतील एका कारखान्यात काम करायचे. त्यांचा मुलगा 8 वर्षांपूर्वी आजारी पडल्याने दवाखान्यात उपचार घेत होता. त्यावेळी त्यांच्या आजारी मुलाला पाहण्यासाठी कारखान्यातील त्यांचे पाच सहकारी खासगी जीपने दवाखान्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटानजीक झालेल्या अपघातात त्यांचे पाचही जीवलग मित्र ठार झाले. तेव्हापासून वसंत शिंदे अत्यंत हळवे झाले होते. दर दोन-चार दिवसाला घाटातील अपघात स्थळी येऊन मित्रांच्या आठवणीने ते रडत बसायचे. हा प्रकार गेली 8 वर्षे सातत्याने सुरु होता. दरम्यान, गुरुवारी शिंदे यांचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन पोलिसांनी कारखान्यात संपर्क साधला, तेव्हा हा सारा इतिहास स्पष्ट झाला. त्यांनी विषप्राशन केल्याचे पोस्टमार्टममध्ये कळून चुकले. मित्रांच्या मृत्यूचे दुःख वारंवार उफाळून येत असल्यानेच या कामगाराने अपघातस्थळी विषप्राशन करत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समजताच परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात आली