शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांना ७६४८ कोटींचे अनुदान

By admin | Updated: December 10, 2015 02:53 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) रद्द करण्यात आला आहे. यामुळे उत्पन्नात होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना ७६४८.८२ कोटीचे सहायक अनुदान देण्यात येत

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) रद्द करण्यात आला आहे. यामुळे उत्पन्नात होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना ७६४८.८२ कोटीचे सहायक अनुदान देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एलबीटी भरणाऱ्या ९९.५ टक्के व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला. सहायक अनुदानाची परिगणना करताना महापालिकेचे मागील पाच वर्षातील जकातीचे उत्पन्न आधारभूत मानून त्यावर ८ टक्के वाढ विचारात घेऊ न २०१५-१६ या वर्षासाठी महापालिकांना देय होणारे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकांना जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात सांगितले.महापालिकांना प्रतिमाह देय होणारे अनुदान हे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात संबंधित महापालिकांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. एलबीटीमुळे महापालिकांच्या उत्पन्नात येणारी तूट भरून काढण्यासाठी आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या पाच महिन्याच्या कालावधीसाठी २०९८.४० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पूरक मागणीद्वारे तरतूद करण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे महापालिकेला जानेवारी ते मार्च या कलावधीत ९०.६६ कोटी अनुदान देय ठरते. २०१६-१७ या वर्षासाठी या महापालिकेसाठी ६५७.३५ कोटीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली. सदस्य शरद रणपिसे, मुझफ्फर हुसैन सय्यद व संजय दत्त आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)