शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत पूर्ण केला

By admin | Updated: February 12, 2017 20:43 IST

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

ऑनलाइन लोकमतनरसीफाटा (नांदेड), दि. 12 - केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. गत ७० वर्षांत झाली नाहीत इतकी कामे अडीच वर्षांत पूर्ण करत विकासाचा अनुशेष भरून काढल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नरसीफाटा येथे आयोजित जाहीर सभेत केले.नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ नरसीफाटा (ता. नायगाव) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. मंचावर माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आ. तुषार राठोड, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रावण पाटील भिलंवडे, बालाजी बच्चेवार, जिल्हा चिटणीस राजू गंदीगुडे, उमेदवार माणिकराव लोहगावे, मीनलताई खतगावकर, लक्ष्मण ठक्करवाड आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपा सरकार सत्तेत आले, तेव्हा राज्यात दुष्काळामुळे भयावह स्थिती होती. तिजोरीत एक रूपया नसताना आम्ही दुष्काळावर मात करत शेतकऱ्यांसाठी १७ हजार कोटी रुपयांच्या उपाययोजना केल्या. महाराष्ट्रातील २० हजार गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेऊन ही योजना शेतकरी, शेतमजूर यांच्या मदतीने पूर्ण केली. यातून २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली़ यापूर्वीच्या सरकारने जलसिंचनावर राज्यात ७० हजार कोटी खर्च केले. मात्र यातून पाण्याचा एक थेंब अडवता आला नाही, असे म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प मागील सरकार पूर्ण करू शकले नाही. पण मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जातील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना विजेसाठी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यातून जून २०१७ नंतर शेतातील विद्युत पंपासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. काँग्रेसने गोरगरिबांसाठी दहा वर्षांत जेवढी घरे उपलब्ध करून दिली. त्यापेक्षा जास्त घरे आम्ही सत्तेवर आल्यापासून उपलब्ध करून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ पर्यंत राज्यात एकही माणूस घराविना राहणार नाही. पूर्वी बँका श्रीमंतालाच कर्ज देत; पण आमच्या आदेशाने राज्यातील एक कोटी गरिबांना बँकेतून कर्ज मिळाले आहे.विकास निधी देताना स्थानिक पातळीवर सत्ता कुणाची, असा विचार कधीच केला नाही. जिल्हा परिषदेसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. निधी वाटपात दुजाभाव केला नाही. याउलट यापूर्वीच्या सरकारने ७० वर्षांत काय केले याचा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.>मराठा आरक्षणावरून सभेत घोषणामुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना मराठा आरक्षणाचे काय झाले म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला़ त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहत बसा बसा, मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देणार आहोत, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली़ सभेत घोषणाबाजी करणाऱ्या गुलाबराव जाधव, दशरथ कपाटे, सतीश पाटील पवार, किरण पाटील दिघळीकर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.