शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

महाड शहरात ६२६ चिमण्यांची नोंद

By admin | Updated: April 4, 2017 03:49 IST

सिस्केप या संस्थेतर्फे १ एप्रिल रोजी महाड शहरातील चिमण्यांच्या गणतीचा कार्यक्रम हाती घेतला होता

महाड : गिधाड संवर्धनाच्या कामामध्ये संपूर्ण जगभरात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सिस्केप या संस्थेतर्फे १ एप्रिल रोजी महाड शहरातील चिमण्यांच्या गणतीचा कार्यक्रम हाती घेतला होता. या पाहणीत चिमण्यांच्या संख्येमध्ये होणारी घट ही गंभीर बाब असल्याचे मत पक्षिमित्र प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले. महाड शहरात ६२६ पर्यंत चिमण्या असल्याची नोंद करण्यात आली. येथील चिमण्यांची संख्या वाढवणे सहज शक्य आहे, मात्र यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेस्त्री यांनी केले आहे.जागतिक स्तरावर चिमणी या पक्ष्याची दखल घेतली जाते. २० मार्च हा जागतिक चिमणी दिन अनेक देशात पाळला जातो. या दिवशी सर्वत्र चिमण्यांची घरटी तयार करून ठिकठिकाणी ठेवली जातात. साधारणपणे उन्हाळ्यात या चिमण्यांच्या विणीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे या काळात त्यांची घरटी बनवण्याची खूप धडपड सुरू असते. मात्र दुर्दैवाने शहरांच्या ठिकाणी त्यांना योग्य जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच शहराच्या ठिकाणी चिमण्यांचा वावर कमी प्रमाणात असल्याचे पक्षिमित्रांनी केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट होत आहे. मोजण्यात आलेल्या चिमण्यांची संख्या महाड शहरात ६२६ पर्यंत असल्याची नोंद या पक्षिमित्रांना आढळून आली. सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, विक्रांत खुळे, ओमकार माने, सुयश नांदगावकर, श्रध्दा जोशी, माधव डाकणे, अविनाश घोलप, मंदार कदम, सपना शेठ, अमोल वारेगे, चिंतन वैष्णव आदींनी या गणतीत सहभाग घेतला. (वार्ताहर)