शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीने केली सहा वर्षीय मुलीची हत्या

By admin | Updated: August 22, 2016 20:04 IST

आपल्या सहा वर्षीय मतिमंद मुलीची नायलॉन दोरीने गळा आवळून जन्मदात्रीनेच हत्या केली. त्यानंतर आपणही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमतब्रह्मपुरी (चंद्रपूर), दि. २२  : आपल्या सहा वर्षीय मतिमंद मुलीची नायलॉन दोरीने गळा आवळून जन्मदात्रीनेच हत्या केली. त्यानंतर आपणही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र घरमालकाच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न फसला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास येथील वाल्मिक नगरात घडली. खुशी सिध्दार्थ रामटेके असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेत मृताची आई नलू रामटेके (३७) ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

वाल्मिक नगरात शिलावंत मेश्राम यांच्या घरी सिद्धार्थ रामटेके हे किरायाने राहतात. सिद्धार्थ रामटेके हे नेहमीप्रमाणे किन्ही येथील शाळेत गेले असता घरी आई नलू व मुलगी खुशी घरी होते तर मोठी मुलगी शाळेत गेली होती. खुशी ही मतीमंद होती. त्यामुळे आई नलू ही नेहमी चिंताग्रस्त असायची. सततच्या चिंतेमुळे नलूचेही मानसिक संतुलन ढासळत चालले होते. याच अस्वस्थेतून आज दुपारी नलूने आपली सहा वर्षीय मुलगी खुशीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:लाही संपविण्यासाठी नलून गळफास घेतला.

परंतु याच वेळी मोठी मुलगी शाळेतून घरी आली. तिने दार ठोठावले. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरमालकाला सांगितले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता खुशी मृतावस्थेत तर आई नलू तडफडत असल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी घटनास्थळ गाठून नलूला बाहेर काढले. गंभीर असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई नलूवर गुन्हा दाखल करण्यात आला.