शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६ टक्के बालकांचा अतिसाराने मृत्यू

By admin | Updated: July 29, 2016 01:48 IST

अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे : अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना होणाऱ्या जुलाबामुळे बालकांच्या शरीरातील पाण्याचे, तसेच क्षारांचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कमी होऊन प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. यावर जलसंजीवनी हा अतिशय उत्तम उपाय असून, त्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन २९ जुलै या जागतिक जलसंजीवनी दिनाच्या निमित्ताने जगभरातून होताना दिसत आहे. अतिसार दीर्घकाळ राहिल्यास मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशक्तपणा येतो, तसेच वजन कमी होऊन कुपोषणाची समस्याही ओढवू शकते. जलसंजीवनीमध्ये ग्लुकोज, सोडिअम, पोटॅशियम व सायट्रेट हे महत्त्वाचे घटक असतात. जुलाबांमुळे शरीरातील हे क्षार बाहेर फेकले गेल्याने अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा आणि शुष्कता भरून काढण्यासाठी जलसंजीवनी अतिशय उपयुक्त ठरते. बालकाला देण्यात येणाऱ्या जलसंजीवनीतील घटकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या प्रमाणात असणे आवश्यक असते.१ लीटर पाण्यात एक पाकीट टाकावे व दर पाच मिनिटाला एक चमचा अशा प्रमाणात ही जलसंजीवनी देण्यात यावी. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे बालरोग संघटनेकडून सांगण्यात आले. ही संजीवनी देण्याचे योग्य ते प्रशिक्षण डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनीही अतिसार झालेल्या बालकाला औषधे देताना सर्वप्रथम जलसंजीवनी देणे आवश्यक आहे. ही जलसंजीवनी औषधांच्या दुकानांबरोबरच किराणा दुकान किंवा जनरल स्टोअरमध्येही उपलब्ध व्हावी, यासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना प्रयत्नशील असल्याचे डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. जलसंजीवनी हा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय असून, बाळाला ते जरूर देण्यात यावे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)- बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये अतिसार असलेल्या, तसेच नसलेल्या बालकांनाही जलसंजीवनी देण्यात आली. अतिसाराच्या बालकांची संख्या कमी करणे आणि यामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.