शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मानखुर्द बालसुधारगृहात ६ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2016 05:49 IST

मानखुर्दच्या बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

समीर कर्णुक,  मुंबईमानखुर्दच्या बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब येथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवली असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.मुलांच्या मृत्यूच्या घटनेला मानखुर्द बालसुधारगृहाचे अधीक्षक राहुल कंठीकर यांनीही दुजोरा दिला आहे. समाजातील अनाथ, वंचित, गतिमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृहे आहेत. ‘द चिल्ड्रेन्स एड सोसायटी’ या बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेकडे या सगळ्या सुधारगृहांचा कारभार आहे. राज्याचे गृहमंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपद महिला व बालविकासमंत्र्यांकडे असते. मात्र या नेत्यांना बालसुधारगृहांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नसल्याने या सुधारगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुंबईतील या आठ बालसुधारगृहांपैकी मानखुर्दमधील बालसुधारगृहात सामान्य मुलांसोबत गतिमंद व विविध आजारांनी ग्रासलेल्या मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या उपचारासाठीची सामग्री, औषधांसाठी पैसाही तिजोरीत नसल्याने येथे ही मुले तडफडत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुलांना राहण्यासाठी योग्य जागा नाही, पौष्टिक अन्न नाही, कपडे नाहीत, पिण्यासाठी योग्य पाणी नाही अशा अनेक समस्या येथे मुलांना भेडसावत आहेत. शासनाकडून एका मुलामागे केवळ ६३५ रुपये निधी दिला जातो. यामध्ये मुलांचा खर्च भागवणे अत्यंत कठीण जात असल्याने देणगीदार शोधण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.योग्य उपचारांअभावी मुलांचा मृत्यू ओढवत आहे. गेल्या दीड महिन्यात ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले अल्पवयीन असून यात एका मुलीचाही समावेश आहे.