शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जि.प., पं.स.साठी ५५७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 03:47 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्यासह अन्य पक्षातील ५५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण सभा, रॅली, आरोप- प्रत्यारोपांनी चांगलेच तापणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बहुतांश राजकीय पक्षातील बंडोबांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे राहिले होेते. बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी राजकीय डावपेच आखत त्यांना थंड करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १३५ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर ११८ पंचायत समितीच्या जागांसाठी २३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणामध्ये आता ३७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.