शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमंगल'तर्फे उद्या ५५ जोडप्यांचा विवाह

By admin | Updated: January 17, 2017 05:54 IST

लोकमंगल फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, १८ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार

मुंबई : लोकमंगल फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, १८ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार असून, त्यात ५५ सर्वधर्मीय जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. विवाहावेळी येणाऱ्या अडचणी, पैशाची उधळण, जाचक हुंडा पद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून सुभाष देशमुख गेली अकरा वर्षे लोकमंगलतर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. आतापर्यंत एकूण २२४८ जोडपी लोकमंगल सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत. ही चळवळ केवळ सोलापूरपुरती मर्यादित न राहता उस्मानाबादमध्येही गेली पाच वर्षे असे सोहळे होत आहेत. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची सोय, मामांना मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणीमंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहे. तसेच स्वयंपाकघरात लागणारी भांडीही दिली जाणार आहेत.मुलगी वाचवा अभियानांतर्गत विवाह सोहळ्यातील वर-वधूंना जर मुलगी झाली तर त्या मुलीच्या व फाउंडेशनच्या संयुक्त नावाने २००० रुपयांची ठेव योजना सुरू केली आहे. आतापर्यंत १२५ जणांच्या नावे ठेव केलेली आहे. लोकमंगल सोहळ्यातील जोडप्यास त्यांच्या शिक्षणाप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते आणि वधू-वरास व्यवसायासाठी कमी दराने कर्जही देण्यात येते. (प्रतिनिधी)