शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी

By admin | Updated: August 27, 2014 00:58 IST

शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत.

अनेकांना कायमचे अपंगत्व : अघोरी प्रथेपुढे प्रशासन हतबलसंजय खासबागे - वरुडशेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे. प्रेमकथेच्या आख्यायिकेवरुन अनेक वर्षांपासून सावरगाव आणि पांढुर्णा या नदीकिनारी असलेल्या दोन्ही गावांत पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरते. प्रेमवीरांची ही कहाणी जपणाऱ्या दोन्ही गावातील नागरिक एकमेकांवर दगडफेक करतात. येथील गोटमार यात्रेत येणारा प्रत्येक माणूस एक दगड मारल्यानंतरच चंडी मातेचे दर्शन घेतो. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष उभारून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजाअर्चा झाली की, गोटमार यात्रेला सुरुवात होते. माध्यान्नानंतर या यात्रेला रंगत चढते. विदर्भासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून ही गोटामर यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. सावरगांव आणि पांढुर्ण्यांच्या भोळ्याभाबड्या नागरिकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरु असताना गंभीर आणि किरकोळ दुखापती होणाऱ्यांकरिता मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येते. यावेळीही ते होते. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा दरवर्षी येथे भरते. सावरगाव आणि पांढुर्ण्यातील नागरिक तुफान दगडफेक करुन झेंडा आणण्याचा प्रयत्न करतात. अखेर दोन्ही गावांतील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडी देवीच्या मंदिरात आणून विधिवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. यंदा या गोटमार यात्रेत ५०५ जण जखमी झाले आहेत. गोटमारीसाठी दगडाचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसात तणाव झाला होता. श्रध्देतून निर्माण झालेल्या अंध्दश्रध्देमुळे अनेक महिला विधवा झाल्या. कुणी अंध, अपंग झाले. केवळ चंडी मातेच्या अंगाऱ्याने दुखापत बरी होते यावर येथील नागरिकांचा विश्वास आहे. गोटामार यात्रेत गोटमारीत ६० वर्षात १२ लोकांचे बळी गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये महोदव सांबारे, १९७८ मध्ये देवराव सकर्डे, १९७९ मध्ये लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये विठ्ठल तायवाडे, योगिराज चवरे, गोपाल चन्ने, सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.