शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

५०० किलो निर्माल्य जमा

By admin | Updated: September 18, 2016 00:52 IST

भीमा नदीच्या विसर्जन घाटावर गणपती विसर्जनाचे सुमारे ५०० किलो निर्माल्य जमा करून कंपोस्ट खतनिर्मितीसाठी शाळेला दिले.

तळेगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी येथील विद्यार्थी व युवकांनी पुढाकार घेऊन भीमा नदीच्या विसर्जन घाटावर गणपती विसर्जनाचे सुमारे ५०० किलो निर्माल्य जमा करून कंपोस्ट खतनिर्मितीसाठी शाळेला दिले.विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्रीपांडुरंग विद्यामंदिर, मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या निर्माल्य संकलन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, हा उपक्रम शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष पी. बी. जगताप व प्रा. संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश राऊत, घनश्याम गवारे, श्याम गवारे व श्रीपांडुरंग विद्यामंदिराचे विद्यार्थी यांनी यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी दिवसभरात सुमारे ५०० किलो निर्माल्य गणेशभक्तांकडून विसर्जनाच्या दरम्यान जमा केले. भीमा नदीच्या घाटाचा परिसर स्वच्छ केला. यावर्षीच्या निर्माल्य संकलनास गणेशभक्तांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वत:हून निर्माल्य जमा केले. या निर्माल्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर न कुजणारे प्लॅस्टिक, थर्माकोल यांसारखे पदार्थ विद्यार्थ्यांनी निर्माल्यातून स्वतंत्र केले व याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. भीमा नदीच्या पाण्यात या उपक्रमामुळे फक्त श्रीगणेश मूर्तींचेच विसर्जन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणास आळा बसला. विशेषत: सर्व गणेश मंडळे व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यास आलेल्या गणेशभक्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी उपसरपंच दिलीप गवारे, अ‍ॅड. संतोष गवारे उपस्थित होते. (वार्ताहर)>गेल्या तीन वर्षांपासून गणेश विसर्जनादरम्यान जमा होणाऱ्या निर्माल्याचे श्रीपांडुरंग विद्यामंदिरमधील विद्यार्थी कंपोस्ट खत तयार करतात, याचा उपयोग शालेय आवारातील व विठ्ठलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील झाडांना हे कंपोस्ट खत टाकले जाते. या वर्षीही गतवर्षाच्या तुलनेत दुपटीने निर्माल्य जमा करून कंपोस्ट खताच्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे भीमा नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास चांगलीच मदत झाली.- पी. बी. जगताप, अध्यक्ष, शिरूर तालुका कला-शिक्षक संघ>पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम स्तुत्य असून, गाव स्वच्छ करण्यास स्वत:हून विद्यार्थी व युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. निर्माल्य संकलनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५ फुटी कलश देण्यात आला होता. पुढील वर्षी गणेश विसर्जनही हौदामध्ये करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल.- दिलीप गवारे, उपसरपंच, ग्रामपंचायत विठ्ठलवाडी