शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

By admin | Updated: March 20, 2017 21:36 IST

जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़

२१९ प्रकल्प : पाण्याचा जपून वापर करण्याची गरजउस्मानाबाद : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने मागील चार वर्षाचा दुष्काळ धुवून काढला़ जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ मात्र, मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे़अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मागील चार वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना केला़ दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता़ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले होते़ पाण्याअभावी खरिपासह रबी हंगामातील पिकेही हातची गेल्याने आणि वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते़ अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले़ १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव, माकणी येथील निम्न तेरणा, कळंब नजीकचा मांजरा प्रकल्पासह शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे मध्यम, लघू प्रकल्प भरले होते़सलग चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता़ असे असले तरी मागील पाच महिन्याच्या काळात या प्रकल्पातून तब्बल ५० टक्के पाणीउपसा करण्यात आला आहे़ सद्यस्थितीत २१९ पैकी एक प्रकल्प कोरडा पडला असून, २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ ७० प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ८६ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा आहे़ वाढते उन आणि होणारा पाणीउपसा यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे़ ही बाब पाहता प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर होण्याची गरज आहे़ पाणी वापराचे नियोजन न झाल्यास जिल्हावासियांना भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (चौकट)प्रकल्पांची परिस्थितीउस्मानाबाद तालुक्यातील रूईभर प्रकल्पात ६८़२६ टक्के, तेरणा ६३़१५ टक्के, वाघोली प्रकल्पात ५१़ ३५ टक्के, कळंबमधील रायगव्हाणमध्ये ६६़७० टक्के, भूममधील बाणगंगा प्रकल्पात ३६़४०टक्के, संगमेश्वर प्रकल्पात ५०़३७ टक्के, परंडा तालुक्यातील खासापूर प्रकल्पात ४१़२३ टक्के, चांदणी प्रकल्पात ३३ टक्के, खंडेश्वर प्रकल्पात ५२़२ टक्के, साकत प्रकल्पात ७३़८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़सिना-कोळेगाव मध्ये ४४ टक्के उपयुक्त पाणीजिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात ४४़२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या प्रकल्पात प्रत्यक्षात १०७़८४० दलघमी पाणीसाठा असून, यातील ३३़५४० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी ४४़२२ टक्के आहे़ तर माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात प्रत्यक्षात ६०३़८०० दलघमी पाणी असून, यातील ७४़८५९ दलघमी उपयुक्त पाणी आहे़ हा उपयुक्त पाणीसाठा ८२़६३ टक्के इतका आहे़ मागील वर्षी होते केवळ ०़७४ टक्के पाणीमागील वर्षी सन २०१६ मध्ये मार्च महिन्याच्या मध्यावधीच्या कालावधीत जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांमध्ये केवळ ०़७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला़ चालू महिन्यात सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये ३८़७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़