शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांमध्ये सुरू होणार ५० वस्ती क्लिनिक

By admin | Updated: August 17, 2016 01:25 IST

महापालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ४ क्लिनिकची सुरुवात करण्यात आली असून

पुणे : महापालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ४ क्लिनिकची सुरुवात करण्यात आली असून, येत्या महिनाभरात ५० क्लिनिक सुरू होणार आहेत. यामध्ये महापालिकेचे डॉक्टर नागरिकांच्या घरांपर्यंत पोहचून त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेणार आहे, त्याचबरोबर छोट्या आजारांवर औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.दिल्ली महापालिकेच्या वतीने वस्ती क्लिनिकचा प्रयोग राबविला असून याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने झोपडपट््यांमध्ये वस्ती क्लिनिक योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्ट पासून मंगळवार पेठ, येरवडा भागांमध्ये ४ वस्ती क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.महापालिकेची समाजमंदिर, सभागृह, आरोग्य कोठी ठिकठिकाणी वस्तीपातळीवर आहेत. तिथेच हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेचे डॉक्टर आठवड्यातील ३ दिवस उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांना तपासून त्यांना तिथे औषधेही दिली जाणार आहेत. महापालिकेची शहरात ६२ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमधील डॉक्टरच नागरिकांसाठी वस्ती क्लिनिकमध्ये उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांच्या घरापर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य विषयक प्रश्न समजण्यास महापालिका प्रशासनाला मदत होणार आहे. छोट्या आजारांवर तिथल्या तिथे लगेच औषधे दिली जाणार आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या साथी पसरू नयेत याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठीही या वस्ती क्लिनिकची मोठी मदत होणार आहे. शहरातील ससून रुग्णालय, औंध सर्वोपचार रुग्णालय येथे किरकोळ आजाराच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वस्ती पातळीवर क्लिनिक सुरू झाल्यामुळे ही गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती क्लिनिकमुळे पुन्हा रुग्ण पालिकेच्या दवाखान्यांकडे वळू शकतील. खासगी हॉस्पिटलकडून साध्या तपासणीसाठी २०० रुपयांपासून ते १ हजार रूपयांमध्ये शुल्क आकारले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब रुग्णांसाठी वस्ती क्लिनिकची योजना फायदेशीर ठरणार आहे.