शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकच्या ५० टक्के जागा रिक्त राहणार

By admin | Updated: June 30, 2015 03:10 IST

राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत.

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा एकूण संस्थांमधील सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे.अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविकेच्या आॅनलाइन प्रक्रियेस १६ जूनपासून सुरुवात झाली. शनिवारपर्यंत केवळ ५० हजार प्रवेश अर्ज दाखल झाल्याने संस्थांचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेवटच्या दोन दिवसांत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने किमान ५० टक्के जागा तरी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे सोयीचे ठरणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने संस्थाचालकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बड्या संख्येने संस्था बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण गेल्या वर्षीही ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.प्रवेश अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास २ ते ४ जुलैदरम्यान अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) मार्गदर्शन केले जाईल. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कॅप राउंडनुसार प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १७ जुलैदरम्यान आॅनलाइन प्रवेशासाठी पसंतीक्रम निश्चित करावे लागतील. या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २० जुलैला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तर दुसऱ्या कॅप राउंडप्रमाणे २१ ते २४ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. समुपदेशनाची फेरी १० ते १४ आॅगस्टदरम्यान पार पडेल. त्या माध्यमातून रिक्त झालेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, तर ३ आॅगस्टपासून कॉलेजेसला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)