शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन नसताना ५ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 03:16 IST

बोईसर पूर्वेकडील शिगाव हाकारीपाडा येथील एका आदिवासी व्यक्तीने वीजपुरवठ्यासाठी १५ महिन्यांपूर्वी पैसे भरूनही वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तर दिलाच नाही

बोईसर : बोईसर पूर्वेकडील शिगाव हाकारीपाडा येथील एका आदिवासी व्यक्तीने वीजपुरवठ्यासाठी १५ महिन्यांपूर्वी पैसे भरूनही वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तर दिलाच नाही, उलट ५ हजार १३० रुपयांचे वीजबिल पाठवून धक्का दिला आहे. विजेचे कनेक्शन नसताना वीजबिल पाठवण्याची जी तत्परता दाखविली, तशी तत्परता वीजजोडणीकरिता का दाखवण्यात आली नाही, असा संतप्त सवाल आदिवासी कुटुंबाकडून विचारण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या सरावली सेक्शनअंतर्गत शिगाव हाकरीपाडा येथील आदिवासी समाजातील रामू कोड्या हेमाडा हे कुटुंबासह राहत असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या बोईसर ग्रामीण उपविभागच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात दि. १४ मे २०१५ रोजी वीजपुरवठ्यासाठी रीतसर ६०० रुपये भरले आहेत. त्या १५ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वीजपुरवठा मिळावा, त्याकरिता अनेक वेळा चक्राही मारल्या, परंतु १५ महिन्यांनंतरही त्यांचे कुटुंब वीजपुरवठ्यापासून वंचित आहे.राम हेमाडा या शेतकारी व शेतमजुराला त्यांच्या नावे १९ जुलै २०१६ रोजी पाठवण्यात आलेल्या वीजबिलावर ग्राहक क्र. ००३५५०००६५७९ तर मीटर क्र. डी. ३०६९५०० असून एकूण वीज पॉवर ७० युनिट तर जून २०१६ चे ८२६ युनिटचा वापर दाखवून मागील व चालू असे एकूण रु. ५१३०/- चे वीजबिल पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे हेमाडा कुटुंबाला वीज नसताना बिलाचा शॉक दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. अजुनही त्यांच्याकडे वीज नाही. (वार्ताहर) >रामू हेमाडा यांना वीजपुरवठा देण्याची कार्यवाही आम्ही लगेच करू. - महेश गोधळेकर, सहायक अभियंता (सरावली सेक्शन)