शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यूबद्दल ४६ लाखांची भरपाई

By admin | Updated: November 5, 2015 01:00 IST

सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई

मुंबई : सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.सांगली येथील मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने या अपघातग्रस्त कुटुंबास ४९ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश गेल्या वर्षी मे महिन्यात दिला होता. त्याविरुद्ध न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने केलेले अपील न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने फेटाळले. खंडपीठाने न्यायाधिकरणाच्या निकालात थोडा बदल करून भरपाईची रक्कम ४९ ऐवजी ४६. ६१ लाख रुपये केली. तसेच त्यावर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून सहाऐवजी सात टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस असलेल्या ४४ वर्षांच्या उज्ज्वला गरुड यांचे ३ जानेवारी २००९ रोजी अपघाती निधन झाले होते. एका बैठकीसाठी मुंबईत आलेल्या उज्ज्वला भाड्याच्या स्कॉर्पिओ गाडीने घरी परत चालल्या होत्या. ती गाडी इस्लामपूर येथील रघुनाथ ज्ञानू खांबे यांच्या मालकीची होती व इम्तियाज लुकमान मणेर ती चालवीत होता. मुंबई-पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने जात असता रावेत फाट्याजवळ इम्तियाजचा गाडीवरीलताबा सुटला व ती पलटी झाली. अपघातात उज्ज्वला यांचे जागीच निधन झाले.या अपघाताबद्दल उज्ज्वलाचे पती सुनील परशुराम गरुड व सुमित (२५) व संकेत (२२) या दोन मुलांनी केलेला दावा मंजूर करून सांगलीच्या न्यायाधिकरणाने ४९ लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्याविरुद्ध अपगातग्रस्त वाहनाचा विमा ज्यांनी उतरविला होता त्या विमा कंपनीने अपील केले होते. आता उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या ४६.६१ लाख रुपये भरपाईवर गरुड कुटुंबास २००९ पासूनचे व्याज मिळेल. ही रक्कम पतीला २० टक्के व दोन्ही मुलांना प्रत्येकी ४० टक्के अशी वाटून दिली जाईल. दोन्ही मुलांना मिळणाऱ्या भरपाईपैकी प्रत्येकी १० लाख रुपये त्यांच्या नावे पाच वर्षांसाठी बँकेत मुदत ठेवीत ठेवले जातील. भरपाई गाडीमालक, चालक व विमा कंपनी यांनी मिळून द्यायची आहे. (विशेष प्रतिनिधी)विमा कंपनीचे मुद्दे फेटाळलेमयत उज्ज्वला यांना ६ व्या वेतन आयोगानुसार भविष्यात किती पगार मिळू शकला असता हे गृहित धरून भरर्पाईचा हिशेब करणे चुकीचे आहे. उज्ज्वला खासगी शिक्षण संस्थेत नोकरला होत्या व त्यांची नोकरीही कायम नव्हती. त्यामुळे ६ व्या वेतन आयोगाचा पगार गृहित धरता येत नाही. शिवाय ही संस्था पुढील इतकी वर्षे सुरु राहिलीच असती याचीही खात्री नाही. परंतु उज्ज्वला यांचा पगार व नोकरीचे स्वरूप याविषयी ठोस पुरावे दिले गेले आहेत. शिवाय खासगी संस्था वेतन आयोगानुसार कधीच पगार देत नाहीत, असे नाही.मोटार बेदरकारपणे सूसाट वेगाने चालविली गेली. त्यामुळे आम्ही जबाबदार नाही. पण यास काही पुरावा नाही. ड्रायव्हरची साक्ष काढणे शक्य होते, पण तसे केले गेले नाही.