शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा

By admin | Updated: July 31, 2016 04:42 IST

रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठाण्यातील महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा घातला.

ठाणे : रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठाण्यातील महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात एका कुटुंबातील चौघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.लुईसवाडीत हेमलता हंकारे यांचे अमृता नर्सिंग होम आहे. वज्रेश्वरी येथील अजय किसन राऊत हे वेळोवेळी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येत. याचदरम्यान, त्यांची पत्नी स्वाती, त्यांची सासू सुरेखा पाटील आणि मेहुणी पालवी यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, अजय याने डॉक्टरांना रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्याने डॉक्टरांकडून जमीन खरेदी करण्यासाठी ६५ लाख घेतले. त्यातील २० लाख त्याने डॉक्टरांना परत केले. तसेच याच वेळी या व्यवहारामध्ये मुंबईतील अनिल कल्याणकर यांनी पैसे परत करण्याची हमी स्टॅम्पपेपरवर दिली होती. मात्र, ठरल्यानुसार एक एकर जमीन किंवा ४५ लाख परत मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत त्या पाच जणांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.एन. वाघ करीत आहेत. (प्रतिनिधी)