शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयांत ४३५ कोटी जमा

By admin | Updated: November 13, 2016 03:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली. १० नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील टपाल कार्यालयांत ४३५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पोस्ट मास्तर जनरल यांनी दिली.व्यवहारातून रद्द करण्यात आलेल्या १००० व ५०० नोटा बँकेव्यतिरिक्त टपाल कार्यालयांतूनही बदलून मिळतील, असे मोंदींनी जाहीर केल्यावर, लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकेबरोबरच टपाल कार्यालयांबाहेरही रांगा लावल्या. पुरेसे सुटे पैसे उपलब्ध नसल्याने, पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांतील टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मात्र, १० नोव्हेंबरपासून टपाल कार्यालयांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली. ‘१० नोव्हेंबरला टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा बचतखात्यात जमा करून घेतल्या, तसेच टपाल कार्यालयांत खाते नसलेल्यांना नोटा बदलूनही दिल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकूण २०५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा राज्यातील टपाल कार्यालयांत जमा झाल्या, तर शुक्रवारी २३० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा टपाल कार्यालयांत जमा करण्यात आल्या,’ असे महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पीएमजी एच. सी. अग्रवाल यांनी सांगितले. टपाल विभागाने गुंतवणुकीच्या योजना लोकांना समजावून दिल्या, त्यांना लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘आमच्या योजनांमध्ये अनेक लोकांनी रस दाखवला. टपाल कार्यालयांत बचतखाते सुरू करण्यासाठी व अन्य योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेकांनी फॉर्म नेले आहेत,’ असेही अग्रवाल यांनी म्हटले.(प्रतिनिधी)