शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात मीटर नसलेले ४३०० नळजोड

By admin | Updated: May 14, 2014 05:56 IST

शहरात ४३०० नळजोडांना मीटर नाहीत. महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही अधिकृत मीटर बसवून न घेता, बेहिशेबी पाणी वापर होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

पिंपरी : शहरात ४३०० नळजोडांना मीटर नाहीत. महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही अधिकृत मीटर बसवून न घेता, बेहिशेबी पाणी वापर होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या मीटर नसलेल्या रहिवाशांच्या यादीत काही लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी अशा बड्या मंडळींच्या नावांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना नळाला मीटर लावण्यास भाग पाडले जात असताना, बड्या मंडळींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. नळजोडाला मीटर नसलेले ४ हजार २०० रहिवासी असून, त्यामध्ये ९४ व्यावसायिकांचा यामध्ये समावेश आहे. महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा योजनेची आखणी केली. त्यानुसार मीटर पद्धतीचा अवलंब करण्याचे धोरण आखले. महापालिकेने स्वत: मीटर बसविण्याचे काम हाती घेतले. महापालिका हद्दीतील एकूण १ लाख ३९ हजारपैकी ६५०० नळजोड झोपडपट्टीत आहेत. आतापर्यंत १ लाख २३ हजार नळजोडांना मीटर बसवले आहेत. उर्वरित मीटर बसविण्यास महापालिकेने आखडता हात घेतला. नागरिकांनी स्वखर्चाने मीटर बसवावेत, असे आवाहन केले. ज्यांनी अनधिकृत नळजोड घेतले आहेत, त्यांनी मीटर बसवून घ्यावेत. अनधिकृत नळजोड नियमित करून घ्यावेत अन्यथा महापालिका कठोर कारवाई करेल, असा इशारा देण्यात आला. सर्वसामान्यांनी कारवाईच्या भीतीने नळाला मीटर बसवून घेतले. अनेक धनदांडग्यांनी मात्र अद्यापही मीटर बसवले नसल्याचे मीटर न बसविलेल्यांच्या लांबलचक यादीतून स्पष्ट झाले आहे. पाणी उपशासाठी विद्युत मोटर पाणी किती वापरले याच्या ‘रीडिंग’साठी मीटर नाही, पण पाणी उपसा करण्यासाठी नळाला विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करण्याचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेकडे नोंद न करता अनधिकृत नळ जोडद्वारे, फुकट अमर्याद पाणी वापरणारे दुर्लक्षित रहातात. विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करणार्‍यांवर ठोस कारवाईस अधिकारी धजावत नाहीत. परिणामी पाणी वितरण व्यवस्थेत त्रुटी कायम राहते, शिवाय पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे उघड झाले आहे. विद्युत मोटारीने पाणी उपसा करणार्‍यांवर कारवाई नाही. सामान्यांना मात्र काटकसरीने पाणी वापरण्याचे बंधनकारक केले जाते. मनपाचे हे धोरण अन्यायकारक आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (प्रतिनिधी)