शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचे हॉटेल विकले गेले ४.२८ कोटींना

By admin | Updated: December 10, 2015 02:27 IST

अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील एका हॉटेलसह देशभरातील ठिकठिकाणच्या सहा स्थावर मालमत्ता व एका मोटारीचा सोमवारी जाहीर लिलाव करण्यात आला.

मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील एका हॉटेलसह देशभरातील ठिकठिकाणच्या सहा स्थावर मालमत्ता व एका मोटारीचा सोमवारी जाहीर लिलाव करण्यात आला. त्यापैकी पाकमोडिया स्ट्रीट येथील हॉटेल रौनक अफरोज तथा दिल्ली जायका अखेर ४ कोटी २८ लाखांना विकण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा समिती या स्वयंसेवी संस्थेचे एस. बालाकृष्णन यांनी सर्वाधिक बोली लावत हा लिलाव जिंकला. त्याचप्रमाणे दाऊदची हुंदाई कंपनीची मोटार ३२ हजारांना हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी विकत घेतली. माटुंग्यातील फ्लॅट व गुजरातमधील चार शेतजमिनी अनुक्रमे मिलन संघवी, मुकेश शहा, जयदीप डोलनिसा व सुरत येथील राजबहाद्दूर शर्मा यांनी खरेदी केल्या. एकूणच दाऊदच्या आर्थिक साम्राज्याचे एकेक बुरुज ढासळण्यास सुरुवात झाली आहे. कुलाबा येथील हॉटेल डिप्लोमॅटिकमध्ये अश्विन अ‍ॅण्ड कंपनी आॅक्शनर्स या खासगी कंपनीद्वारे दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. त्यासाठी एकूण २० जणांची हॉटेलमध्ये उपस्थिती होती. प्रत्यक्षात केवळ ६ जणांनी लिलावात सहभाग घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पहिल्यांदा गुजरातमधील नानी दमण येथील शेती, त्यानंतर माटुंगा येथील फ्लॅट, हॉटेल दिल्ली जायका व हुंदाई मोटार या क्रमाने लिलाव करण्यात आला. २००० या वर्षाचे मॉडेल असलेली हिरव्या रंगाची मोटार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी ३२ हजारांची बोली लावत विकत घेतली. त्यानंतर माटुंगा येथील फ्लॅट व गुजरातमधील भूखंडाचे लिलाव झाले.>> नव्या मालकांना महिन्यात ताबा!मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमच्या देशभरातील सात मालमत्तांचा लिलाव पार पडल्यानंतर नव्या मालकांना आता उर्वरित रक्कम भरल्यानंतर या मालमत्तांचा महिनाभरात ताबा मिळणार आहे.लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याने सर्वाधिक किंमत देण्याची तयारी दर्शविली, त्याला निश्चित केलेल्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम जागेवर भरावयाची होती. त्यानंतर उर्वरित रक्कम एक महिन्यात द्यावयाची आहे. त्यानंतर जागेची मालकी संबंधिताच्या नावावर हस्तांतरित केली जाणार आहे. आयकर विभागाकडून तस्करी विदेश विनिमय मुद्देमाल जप्त कायदा १९७६ (एसएएफईएम ,एफओपी,ए) व अंमलीपदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) या कलमान्वये अधिकृत मान्यता प्राप्त संस्थेकडून ही कार्यवाही केली जात आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी केवळ इच्छुकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येत होता. लिलाव प्रक्रियेत सहभागासाठी किमान चार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले होते. पहिल्यांदा गुजरातमधील नानी दमण येथील शेती, त्यानंतर माटुंगा येथील फ्लॅट, हॉटेल दिल्ली जायका व हुंदाई मोटार या क्रमाने लिलाव करण्यात आला. २००० या वर्षाचे मॉडेल असलेली हिरव्या रंगाची मोटार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी ३२ हजारांची बोली लावत विकत घेतली. त्यानंतर माटुंगा येथील फ्लॅट व गुजरातमधील भूखंडाचे लिलाव झाले. (प्रतिनिधी)एक रुपया देण्याचे आवाहन...सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हॉटेल दिल्ली जायकाची बोली जिंकण्यात यशस्वी ठरलेले एस.बालाकृष्णन म्हणाले, ‘आपली संस्था खूप मोठी नाही. मात्र बदनाम झालेल्या या भागातूनच विधायक कृत्य करण्यासाठी आपण या लिलावात सहभागी झालो. या जागेत गरीब महिला व अनाथ मुलांसाठी संगणकाचे प्रशिक्षण सुरु करणार आहोत. पूर्ण किंमत देण्याची सध्यस्थिती नाही. त्याशिवाय हॉटेलचे विविध प्रकारचे कर, लाईट ,पाण्याच्या बिलाची थकबाकी किती आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर भारतातून फरार झालेल्या दाऊदच्या देशभरातील संपत्तीवर केंद्र सरकारने टाच आणली आहे. त्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी आयकर विभागाने अश्विन अ‍ॅण्ड कंपनी आॅक्शनर्सची नियुक्ती केलेली आहे. या कंपनीकडून टप्प्याटप्प्याने लिलाव प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दाऊदचे बरेच नातेवाईक पाकमोडिया स्ट्रीट परिसरातच राहतात. परदेशातील मालमत्तेचा लिलाव करणारदाऊद इब्राहिमच्या सोमवारी लिलाव करण्यात आलेल्या सात मालमत्ते शिवाय भारतात अन्य काही ठिकाणी तसेच परदेशातही विशेषत: पाकिस्तान, दुबई, सौदीमध्ये त्याची हजारो कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकार संबंधित देशावर दबाव आणून त्या ताब्यात घेणार असून त्याचाही टप्प्याटप्प्याने लिलाव केला जाईल, असे केंद्रीय गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.> दाऊदच्या मालमत्तेचा यापूर्वी तीनवेळा लिलाव करण्यात आलेला होता. मात्र दहशतीमुळे त्यामध्ये फारसे कोणी सहभागी होत नव्हते. त्याच्या तुलनेत या लिलावमध्ये इच्छुकांचे प्रमाण अधिक होते. यापूर्वी २००० साली झालेल्या लिलावामध्ये दिल्लीतील अजय श्रीवास्तव यांनी सहभाग घेवून पाकमोडिया येथील मालमत्ता विकत घेतली होती. मात्र दाऊदची बहिण हसिना पारकरने दावा सांगितला होता. ती मिळकत अद्याप दाऊद कुटुंबियांच्या ताब्यात आहे. श्रीवास्तव यांनी त्याबाबत लघु न्यायालयात दावा दाखल केला असून अद्याप खटला प्रलंबित आहे.> दाऊदच्या कारचे दहन करणारदाऊद इब्राहिमची मोटारीसाठी सर्वाधिक बोली लावलेल्या हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी म्हणाले,‘दाऊदसारख्या देशद्रोह्याबाबतची भीती कमी होणे गरजेचे आहे. लिलावामध्ये सहभागी असलेल्या एकाला धमकाविण्यात आल्याचे समजल्यानंतर आपण मुद्दाम हजर झालो. दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह खरेदी केलेल्या मोटारीचे जाहीर दहन करणार आहोत.’ ते या मोटारीचा वापर रुग्णवाहिका म्हणून करणार होते. मात्र ती नादुरुस्त असल्याचे समजल्यावर त्यांनी ती जाळणार असल्याचे स्पष्ट केले. > लिलाव झालेल्या मालमत्ता व त्याचा तपशील असा मालमत्ता व पत्ताकिमान किंमत खरेदीदारविक्री किंमत३ गुंठे शेती,क्रं.२८५/३, कड्या,नानी दमन१,५००००मुकेश शहा८ लाख३ गुंठे शेती ,क्रं.२८५/५, कड्या,नानी दमन१,५००००मुकेश शहा१२.२५ लाख३ गुंठे शेती क्रं.२९५/३, कड्या,नानी दमन१,५००००जयदीप डोलसानिया२ लाख३ गुंठे शेती क्रं.२९५/३, कड्या,नानी दमन२,०००००राजबहाद्दुर शर्मा१२.४० लाख३२.७७ चौरस मीटर फ्लॅट न.८, माटुंगा ५०,४४,००० मिलन शहा संघवीवादग्रस्तहॉटेल दिल्ली जायका, भेंडी बाजार १,१८,६३,००० देशसेवा समिती४.२८ कोटीहुंदाई कार (एम.एच.०४-एएक्स-३६७६)१५,७००स्वामी चक्रपाल३२,०००