शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बसस्थानकात ४१ लाख जप्त

By admin | Updated: January 30, 2015 00:48 IST

एसटी बसमधून उतरलेला एक तरुण हातात दोन बॅग घेऊन सैरभैर वागताना दिसला. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस शिपायाला संशय आला. त्याने बॅगची झडती घेतली.

यवतमाळ : एसटी बसमधून उतरलेला एक तरुण हातात दोन बॅग घेऊन सैरभैर वागताना दिसला. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस शिपायाला संशय आला. त्याने बॅगची झडती घेतली. त्यामध्ये तब्बल ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची बेहिशेबी रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली. जप्त करण्यात आलेली रोकड ‘हवाला’ची असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही कारवाई येथील बसस्थानकात बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. जिग्नेश रसिकभाई पटेल (२१) रा. ग्रीनपार्क सोसायटी मैसान (गुजरात) ह.मु. रायली प्लॉट अमरावती असे रोकडसह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री तो अमरावती-यवतमाळ बसमधून उतरला. यावेळी त्याच्या हातात दोन बॅग होत्या. त्याचे ओझेही त्याला सांभाळणे कठीण झाले होते. या स्थितीत तो सैरभैर अवस्थेत दिसला. त्यामुळे बॅगमध्ये अवैध दारू तर नाही ना, असा संशय तेथील पोलीस शिपाई केशव आदेवार यांना आला. त्याची चौकशी केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला. शिपाई आदेवार यांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी दोनही बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांंचे अनेक बंडल आढळून आले. त्यांनी ही माहिती वडगाव रोडचे फौजदार संतोष केंद्रे यांना दिली. त्यांनी तत्काळ बसस्थानक गाठून रोखेसह त्या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र ही रक्कम कोठून आणली, ती यवतमाळात कशासाठी आणली, अशा विविध प्रश्नांची उत्तरे संशयित जिग्नेश देऊ शकला नाही. त्यामुळे ही रक्कम ‘हवाला’ची असावी, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. त्यावरून रोकड जप्त करून संशयित जिग्नेश पटेल याच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (१) (अ) (ड) आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)म्हणे, रोकड प्लॉटच्या व्यवहाराची !संशयित जिग्नेश पटेल याने ही रक्कम तीन भागीदार मिळून असलेल्या अमरावतीच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे सांगितले. त्यांनी यवतमाळ येथे एक प्लॉट खरेदी केला आहे. त्याच्याच व्यवहाराची ही रक्कम पोहोचती करण्यासाठी आपण एसटी बसद्वारे आल्याचे पोलिसांपुढे उघड केले. लाखोंचा व्यवहार आणि ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची रोकड एखाद्या तरुणाच्या हाताने, तीही एसटी बसमधून पाठविण्याचा धोका कुणीही पत्करणार नाही, असा पोलिसांचा कयास आहे.