शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, कल्याणमध्ये ४०० सीसीटीव्ही

By admin | Updated: December 30, 2015 01:00 IST

शहर आयुक्तालयातील मोक्याच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला ठाणे शहर त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही लावण्याची

- जितेंद्र कालेकर,  ठाणेशहर आयुक्तालयातील मोक्याच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला ठाणे शहर त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही लावण्याची योजना असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यासाठी १० ते २० कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो महापालिका आणि आमदार निधीतून करण्यात येणार आहे. मुंबईचे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांचीही यासाठी लागणाऱ्या अभ्यासासाठी विशेष मदत घेण्यात येणार असून, परिमंडळ एकचे उपायुक्त सचिन पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची एक कमिटी महत्त्वाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करणार आहे.महत्त्वाची ठिकाणे...शहरातील मुंब्रा, कळवा, राबोडी, वागळे इस्टेट, येऊर, कोलशेत आणि उपवन परिसरात संवेदनशीलतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्याचे प्रयोजन आहे. शहरात विविध सोसायट्या आणि कंपन्यांनी आतापर्यंत १८०० सीसीटीव्ही लावले असून, त्यांचे अँगल्स आणि ठिकाणे बदलून नव्या ठिकाणी हे कॅमेरे लागतील, या दृष्टीनेही अभ्यास करण्यात येत आहे. असे होणार सर्वेक्षण...गुन्हेगारीच्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेचा यामध्ये विशेष विचार केला जाणार आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे, तसेच लुटमारीचे प्रकार जिथे होतात अशी ठिकाणे निवडण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालय, मार्केट आणि महामार्गांवर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जातीय दंगलीची शक्यता असलेली ठिकाणे, मोर्चा, संवेदनशील ठिकाणे आणि दहशतवादाच्या दृष्टीने काही धार्मिक स्थळांचाही यामध्ये समावेश आहे.वाहतुकीच्या दृष्टीने महामार्ग आणि महत्त्वाच्या चौकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. करंदीकर यांनी दिली.खर्चाबाबत जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे काही निधी जिल्हा नियोजन समिती आणि काही निधी पालिकेच्या खर्चातून उपलब्ध होणार आहे.