शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट कर्मचाऱ्यांना हवी ४० टक्के पगारवाढ

By admin | Updated: May 17, 2016 05:34 IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. त्यामुळे नव्या वेतन करारात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.याआधी २००६ ते २०११ आणि सन २०११ ते २०१६ या कालावधीसाठीचा वेतन करार २८ एप्रिल २०१२ रोजी झाला होता. त्यामुळे यंदाचा वेतनकरार वेळेत करण्याची मागणी युनियनने केली आहे. राव म्हणाले की, बेस्ट उपक्रमाने २००७ सालापासून यापूर्वीचा करार होईपर्यंत रोजंदारी पद्धतीने व कनिष्ठ श्रेणी निर्माण करून समारे ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करताना त्यांची मातृश्रेणी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ हजार ९३० करता आली नाही. नव्या कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार ४३० मातृश्रेणी ठरवण्यात आली. परिणामी, या कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. त्यामुळे नव्या वेतन करारात या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी राव यांनी प्रशासनाकडे केली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे युनियनने उपक्रमातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १५ हजार ३०० करण्याची मागणी केली आहे. शिवाय बसवाहक व बासचालकांचे किमान मूळ वेतन अनुक्रमे १६ हजार ६०० व १७ हजार २०० रुपये करण्याची मागणी युनियनने प्रस्तावात केली आहे.प्रस्तावातील अन्य महत्त्वाच्या मागण्याबेस्ट उपक्रमातील महिला कर्मचाऱ्यांना केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बाल संगोपन रजा मिळावी.३ लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावरील व्याजापोटी भरावयाच्या रकमेसाठी अनुदान देण्यात यावे.बेस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ६ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करावी.पालिकेने निधी द्यावाजूनच्या शेवटच्या आठवड्यात महाव्यवस्थापकांकडून यासंदर्भात चर्चेसाठी बैठक होण्याची शक्यता राव यांनी व्यक्त केली. बेस्ट तोट्यात असल्याचे कारण पुढे करत जर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असेल, तर मुंबई महानगरपालिकेने पालक म्हणून बेस्टला निधी देण्याची मागणी राव यांनी केली आहे.