शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

संगणक टायपिंग परीक्षेसाठी ४ ग्रेस गुण

By admin | Updated: April 4, 2017 03:12 IST

संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला.

हुसेन मेमन,जव्हार- राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला. त्यामुळे परीक्षेचा निकाल वाढणार असून विद्यार्थी व संस्थाचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले.शासन मान्यताप्राप्त वाणिज्य शिक्षण संस्थांत संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या गुणदान योजनेत ग्रेस गुणांची तरतूद केलेली नव्हती. मात्र परीक्षा परिषदेच्याच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेच्या विभाग १ मध्ये ५ ग्रेस गुणांची तरतूद आहे. मागील वर्षी एप्रिल २०१६ मध्ये प्रथमच शासकीय संगणक टायपिंगच्या इंग्रजी, हिंदी व मराठी ३० शब्द प्रति मिनिट या गतीची परीक्षा झाली. मात्र, या परीक्षेचा निकाल खूप कमी लागला होता. यानंतर राज्यातील विविध संस्था व संघटनांनी वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेप्रमाणेच संगणक टायपिंग परीक्षेसही ग्रेस गुण देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन २८ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रान्वये जीसीसी टीबीसी ३० शप्रमिसाठी ग्रेस गुणांची तरतूद केलेली आहे. यानुसार शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र (जीसीसी टीबीसी) ४० शब्द प्रति मिनिट व स्पेशल कोर्स इन कॉम्प्यूटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अ‍ॅण्ड स्टुडंट्स (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) या परीक्षेसाठी ग्रेस गुणांची तरतूद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन शासनमान्यता संस्थांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती. हे ग्रेस गुण देण्याबाबत परीक्षा परिषदेच्या कार्यकारी समितीने ठराव पारित करून शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार शासनाने जीसीसी टीबीसी ४० शप्रमि अभ्यासक्रमातील विभाग १.१ ते १.४ साठी एकत्रित २ व विभाग २ मधील अभ्यासक्रमासाठी २ याप्रमाणे ४ ग्रेस गुणांची तरतूद केली आहे.