शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३९ शेतकरी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यावर!

By admin | Updated: September 3, 2014 01:32 IST

विदर्भातील केवळ तीन शेतकर्‍यांना संधी

अकोला : जागतिक कृषी क्षेत्रातील उपलब्धी व त्याचा भारतीय शेतीत वापर करता यावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांचे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे काढण्यात येत असून, यावर्षी राज्यातील ३९ शेतकरी या अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. पश्‍चिम विदर्भातील जवळपास ३0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी यावर्षीच्या दौर्‍यासाठी अर्ज केले होते; परंतु नेहमीप्रमाणे या दौर्‍यात विदर्भातील के वळ तीनच शेतकर्‍यांना संधी देण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.जगातील प्रगत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करू न त्या पद्धतीची आधुनिक शेती येथील शेतकर्‍यांना करता यावी, हा या शेतकरी आंतरराष्ट्रीय दौर्‍यामागील उद्देश आहे. त्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यातील प्रगतिशील शेतकर्‍यांचा आंतराष्ट्रीय अभ्यास दौरा काढण्यात येत असतो. या शेतकर्‍यांचा प्रवासाचा ५0 टक्के खर्च कृषी विभागामार्फत केला जातो. यावर्षी या दौर्‍यासाठी राज्यातील ३९ शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. हे ३९ शेतकरी र्जमनी, स्वित्झरलँड, नेदरलँड यासारख्या कृषी क्षेत्रात अतिशय प्रगत असलेल्या राष्ट्रांना भेटी देऊन, तेथील तंत्रज्ञान अवगत करणार आहेत.दरम्यान, अलिकडच्या काळात विदर्भातील शेकडो शेतकरी शेतात वेगवेळे प्रयोग करीत असून, आधुनिक शेतीकडे त्यांचा कल वाढला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेती कंपन्या स्थापन करू न, व्यावसायिक शेतीलाही सुरुवात केली आहे. आता तर हरितगृह, पॉलिहाऊससारख्या आधुनिक शेतीची कास येथील शेतकर्‍यांनी धरली असून, फलोत्पादनातही आघाडी घेतली आहे; परंतु विदर्भातील अकरा जिल्हय़ातून केवळ अमरावती, बुलडाणा व नागपूर या तीन जिल्हय़ातील प्रत्येकी एका शेतकर्‍याचीच निवड करण्यात आल्याने, इतर इच्छुक शेतकर्‍यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. *शेतकर्‍यांसोबत शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रातील प्रगत राष्ट्रांना भेटी देण्यासाठी विदर्भातील जे तीन शेतकरी आंतरराष्ट्रीय दौर्‍यावर गेले आहेत, त्यांच्यासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले आहेत. या शेतकर्‍यांना त्या प्रगत राष्ट्रातील शेतीसंदर्भातील माहिती ते समजावून सांगणार आहेत.*या अभ्यास दौर्‍यासाठी पश्‍चिम विदर्भातून जवळपास ३0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. हे सर्व अर्ज आम्ही पुणे येथील संचालनालय विस्तार कार्यालयाकडे पाठविले होते. जे शेतकरी निकषात बसले, त्यांची नावे या दौर्‍यासाठी निश्‍चित करण्यात आली .- एस.आर. सरदार सहसंचालक,कृषी विभाग, अमरावती.