शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात डेंग्यूसाठी ३७ सेंटिनल सेंटर्स

By admin | Updated: October 16, 2016 02:35 IST

जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या

मुंबई : जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळून गुंतागुंत कमी व्हावी यासाठी राज्यभरात ३७ सेंटिनल सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांना डेंग्यू रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात आॅक्टोबर महिन्यापर्यंत स्थिरावलेल्या पावसामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) एकूण ४ हजार ८२० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर २५५, नाशिकमध्ये २२२ आणि पुण्यात १६६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिका क्षेत्रात मुंबईत ७८३, नाशिकमध्ये ६४० आणि ठाण्यात ४४३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. २६ महापालिका क्षेत्रात ३ हजार २६० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात पसरलेली चिकनगुनियाची साथ अजूनही आटोक्यात आली नाही. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) पुणे महापालिका क्षेत्र, पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद येथे ८७७ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण परिसरात २६६ रुग्ण आढळले आहेत. आॅक्टोबर महिन्यात मुंबईत चिकनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत, तर चिकनगुनियाचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)डेंग्यूचे ४०७ रुग्ण राज्यात आॅक्टोबर महिन्यात (१ ते ७ आॅक्टोबर) डेंग्यूचे ४०७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात असलेला चिकनगुनिया आता मुंबईतही आला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन साथरोग नियंत्रण कक्षाने केले आहे.