शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ३६ स्थानकांचा होणार कायापालट

By admin | Updated: October 3, 2016 05:41 IST

रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ हा उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई : मुंबई महानगरातील ३६ रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एम.ए.डी.फाउंडेशनच्या या उपक्रमाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी खासदार पूनम महाजन, अभिनेता अनिल कपूर, रेल्वेचे अधिकारी आणि स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, हमारा स्टेशन हमारी शान हा एक चांगला उपक्रम आहे. मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या रेल्वे स्थानकांचा कायापालट या माध्यमातून होणार आहे. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे सुंदर ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला ट्रेनमध्ये प्रवास करताना आनंद वाटला पाहिजे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, मुंबई स्वच्छ करण्याबरोबर सुंदर करायची आहे. यासाठी सवयी बदलाव्या लागतील. स्वयंसेवी संस्था व आणि लोकसहभागातून हा बदल शक्य आहे. त्यासाठी एकला चलो रे, या उक्तीप्रमाणे सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यानंतर लोक स्वत:च मागोमाग येतील. (प्रतिनिधी)>प्रशंसनीय उपक्रमखासदार पूनम महाजन या वेळी म्हणाल्या की, एम. ए. डी. फाउंडेशनने हमारा स्टेशन हमारी शान हा उपक्रम हातात घेऊन प्रशंसनीय काम केले आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वेला आणि मुंबईकरांना भरपूर काही दिले आहे. पुढील तीन वर्षांत मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवर सर्व सुविधा पुरविण्यात येतील.