शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ३६ तलाव कात टाकणार

By admin | Updated: April 4, 2017 04:12 IST

महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली

ठाणे : लोकमतने काहीतरी कर ठाणेकर, या चळवळीअंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेऊन महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली आहे. यानुसार, शहरातील ३६ तलावांचा एकात्मिक सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास राज्य शासनानेदेखील मंजुरी दिली आहे. यामुळेच तलाव पुनरुज्जीवन व शुद्धीकरण या लेखाशीर्षांतर्गत ३० कोटी आणि तलाव सुशोभीकरणांतर्गत ९.५० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे ठाण्यातील तलाव लवकरच कात टाकणार आहेत.ठाण्यातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’ने ‘काहीतरी कर ठाणेकर’, या चळवळीअंतर्गत याला वाचा फोडली होती. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तलवांचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने त्यानुसार पावले उचलली आहेत. महापालिका हद्दीत ३६ तलाव असून त्यांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यासाठी सर्व तलाव व तलाव परिसर प्रदूषणमुक्त व नागरी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी पालिकेने ही योजना आखली आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तलावातील गाळ काढणे, भिंत उभारणे, जॉगिंग ट्रॅक, एलईडी दिवे, गार्डन, खेळणी, शौचालय, फाउंटन, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, निर्माल्यकलश, गेट उभारण्याच्या कामांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वास्तुविशारद महाविद्यालयास सल्लागार म्हणून नेमण्याची योजना आखली आहे. त्यातून हे तलाव कात टाकतील. (प्रतिनिधी)