शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

६० रुपयांची डाळ चोरणारा ३५ वर्षानंतर जेरबंद

By admin | Updated: October 4, 2016 21:22 IST

अकोला रेल्वे स्थानकावरून जात असलेल्या एका मालगाडीतील १९८१ मध्ये डाळ चोरी करणाºया आरोपीस पोलिसांनी तब्बल ३५ वर्षानंतर अटक केली आहे. सदर आरोपी

- सचिन राऊत/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.04 -  अकोला रेल्वे स्थानकावरून जात असलेल्या एका मालगाडीतील १९८१ मध्ये डाळ चोरी करणाºया आरोपीस पोलिसांनी तब्बल ३५ वर्षानंतर अटक केली आहे. सदर आरोपी शंकरनगर आकोट फैल येथील रहिवासी असून त्याने तरुण वयात ही चोरी केल्यानंतर फरार झाला होता, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तब्बल ३५ वर्षानंतर म्हणजेच आरोपी वृद्ध झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
शंकरनगर येथील रहिवासी माणिक दादू नृपनारायण हा बरेच वर्षानंतर त्याच्या घरी आला आहे. त्याने १५ नोव्हेंबर १९८१ मध्ये एका मालगाडीतून ६० रुपयांची १५ किलो डाळ चोरी केली होती. त्यानंतर तो अकोल्यात आला; मात्र पोलिसांना याची माहितीच मिळाली नाही. १९८१ च्या चोरीनंतर मंगळवारी आरोपी अकोल्यात असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांना मिळाली. त्यांनी शंकरनगर येथे पाळत ठेवून आरोपी माणिक नृपनारायण याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने १५ किलो डाळ चोरीची कबुली दिली असून पोलीस त्याला बुधवारी भुसावळ येथील रेल्वे न्यायालयामध्ये हजर करणार  आहे.
 
साथीदाराने भोगली शिक्षा
मालगाडीतील डाळ चोरी प्रकरणातील आरोपी माणिक नृपनारायण याचा साथीदार अशोक कांबळे याला पोलिसांकडून १३ जानेवारी १९८२ रोजी अटक करण्यात आली होती. त्याने चोरीची कबुली दिल्याने भुसावळ येथील रेल्वे न्यायालयाने त्याला एक महिन्याची शिक्षा सुनावली होती. अटकेनंतर २८ दिवसांची शिक्षा भोगली असतानाही त्याने आणखी एक महिन्याचा कारावास भोगला.
 
अशी केली होती चोरी
राजस्थानमधील चिडावा येथून तामिळनाडूतील मदुराईसाठी एक मालगाडी पाठविण्यात आली होती. यामध्ये हरभरा डाळीचे पोते होते. १५ नोव्हेंबर १९८१ रोजी सदर मालगाडी अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर कांबळे आणि नृपनारायण या दोघांनी मालगाडीच्या एका वॅगनचे सील तोडून यामधील ६० रुपये किमतीची १५ किलो हरभरा डाळ चोरली होती. या प्र्रकरणी आरपीएफ पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.