शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

३५ अत्याचार पीडितांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 25, 2016 15:58 IST

बलात्कार झालेल्या पीडितांना जीवन जगण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी शासनाने सुरु केलेल्या मनोधैर्य योजनेत प्रस्ताव मंजूर झालेल्या ३५ पीडितांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा आहे.

१० प्रकरणे ‘कोषागार’कडे पडून : १५ प्रकरणांसाठी शासनाकडून निधीची आवश्यकताविलास बारीजळगाव : बलात्कार झालेल्या पीडितांना जीवन जगण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी शासनाने सुरु केलेल्या मनोधैर्य योजनेत प्रस्ताव मंजूर झालेल्या ३५ पीडितांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा आहे. १० प्रकरणांच्या मदतीचे प्रस्ताव अनौपचारीक संदर्भाअभावी पडून आहेत. तर १० प्रकरणांसाठी २३ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.काय आहे मनोधैर्य योजना?मनोधैर्य योजनेतंर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दोन ते तीन लाखांपर्यंत, महिला व तरुणींवरील बलात्काराच्या प्रकरणात दोन ते तीन लाख रुपये, अ‍ॅसीड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास तसेच कायम अपंगत्व आल्यास तीन लाखांपर्यंत तसेच अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झाल्यास पन्नास हजार रुपयांच्या भरपाईची तरतूद आहे.चार वर्षात ९१ पीडितांवर अत्याचारशासनाने आॅक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजनेला सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या वर्षी पीडित सात जणींना १६ लाख ५० हजारांची मदत देण्यात आली. सन २०१४-१५ या वर्षभरात अत्याचार झालेल्या ३६ पीडिताना ८० लाख ५० हजारांची मदत या योजनेतून देण्यात आली. २०१५-१६ या वर्षात २३ प्रकरणांमध्ये ५० लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. २५ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत.अनौपचारिक संदर्भाचा पीडितांना फटकामहिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत मिळालेला निधी त्याच कामासाठी खर्च केला आहे का? यासाठी वित्त विभागाला उपयोगीता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यानंतर वित्त विभाग महिला व बालकल्याण आयुक्त कार्यालयामार्फत अनौपचारिक संदर्भ देत असतात. महिला व बालकल्याण विभागाने १५ पीडितांना ३८ लाख ५० हजारांच्या आर्थिक मदतीसाठीचे कोषागार कार्यालयाकडे बिले सादर केली आहेत. आयुक्त कार्यालयाकडून अनौपचारिक संदर्भ न आल्याने १५ पीडिता आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.२३ लाखांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला२० जुलैपर्यंत महिला व बालकल्याण विभागाकडे नव्याने १० प्रकरणे प्राप्त झाली आहेत. या पीडितांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी या कार्यालयाकडून २३ लाखांच्या निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनीतील बालिका मदतीपासून वंचितरामेश्वर कॉलनीतील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर मनोधैर्य योजनेतंर्गत या बालिकेला मदतीसाठीचा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने या बालिकेला अद्यापही मदतीची रक्कम मिळालेली नाही.