शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

५८ जागांसाठी काँग्रेसकडून ३४६ इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 02:49 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. श्रीमंत महापालिकेत आपले नशीब आजमविण्यासाठी अनेकांनी तयारी चालविली आहे. त्यातच काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी मुलाखती चालू केल्या आहेत. उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य मुंबईतील एकूण ५८ जागांसाठी तब्बल ३४६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.जिल्हा कमिटीनेच अर्ज आणि मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवार निवडावे, ज्या जागेवर वाद असतील केवळ अशाच प्रभागातील उमेदवारीचा निर्णय विभागीय काँग्रेस पातळीवर घेण्याचे धोरण यंदा मुंबई काँग्रेसने स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने सध्या काँग्रेसमध्ये मुलाखतींचा हंगाम सुरू झाला आहे. शिवाजी नगर येथील १३९ क्रमांकाच्या प्रभागासाठी सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात जिल्हाध्यक्ष वेलू स्वामी नायडू, मनपा विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांचे निकटवर्तीय भवरसिंह राजपुरोहित यांच्यासह १३ जणांचा समावेश आहे. तर, घाटकोपर पूर्वेतील १३२ क्रमांक प्रभागातून केवळ प्रवीण छेडा यांची एकट्याचीच दावेदारी आली आहे. घाटकोपर पश्चिमेतील शिवम् हॉलमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉन मुलाखतींना मोठ्या प्रमाणावर काँग्रेसजनांनी हजेरी लावली. मुलुंड पूर्वेला १०८ आणि १०३ क्रमांकांच्या प्रभागासाठीही मुलाखती झाल्या. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा-दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या. १३३ क्रमांकावरही दहा जणांनी दावा ठोकला होता. प्रत्यक्षात मुलाखतीसाठी मात्र सातच जण आले. येथील ४० जागांसाठी २०६ जणांच्या मुलाखती झाल्याची माहिती काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी दिली. गुरुवारी दक्षिण मध्य मुंबईतील १८ जागांसाठी १४० जणांच्या मुलाखती झाल्या. पहिल्या टप्प्यात धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात अणूशक्ती नगर, चेंबूर आणि माहीममधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता यांनी दिली. १७९ क्रमांकाच्या प्रभागावर तब्बल १९ जणांनी दावा ठोकला आहे. (प्रतिनिधी)> मोठ्या प्रमाणावर हजेरीघाटकोपर पश्चिमेतील शिवम् हॉलमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉन मुलाखतींना मोठ्या प्रमाणावर काँग्रेसजनांनी हजेरी लावली. मुलुंड पूर्वेला १०८ आणि १०३ क्रमांकांच्या प्रभागासाठीही मुलाखती झाल्या. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा-दहा इच्छुकांनी नेत्यांना मुलाखती दिल्या.