शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यांत तीन हजार कोटींचे प्रस्ताव

By admin | Updated: January 4, 2017 05:48 IST

महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ उडाली आहे. शेवटच्या क्षणी विकासकामांचे प्रस्ताव आणण्यासाठी प्रशासनाला

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ उडाली आहे. शेवटच्या क्षणी विकासकामांचे प्रस्ताव आणण्यासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने तीन आठवड्यांत तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. हे प्रस्ताव निवडणुकीच्या धामधुमीत रखडले तरी याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा मार्ग मात्र त्यामुळे मोकळा झाला आहे. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्यामुळे गेले वर्षभर पालिकेचा कारभार जवळपास ठप्पच राहिला. त्यामुळे अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीपैकी केवळ २७ टक्के रक्कम नोव्हेंबर अखेरपर्यंत पालिकेने खर्च केली आहे. याचे भांडवल विरोधकांनी केल्यामुळे शिवसेनेची झोप उडाली आहे. सागरी मार्ग, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा मोठ्या प्रकल्पांबरोबर विभागांत रखडलेल्या लहानमोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार कामाला लागले आहेत. विकासकामांचे बार उडवण्यासाठी झटपट बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. मित्रपक्ष भाजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनाही ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. गेले वर्षभर रखडलेल्या शेकडो प्रस्तावांना स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांत मंजुरी दिली आहे. पहिल्या बैठकीत १३०० कोटींचे ७४ प्रस्ताव आणल्याने शिवसेनेवर टीका झाली. मात्र, विलंबासाठी शिवसेनेने प्रशासनालाच जबाबदार धरले. गेल्या आठवड्यातील बैठकीत आणखी ११०० कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले. यात आज आणखी ६०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांची भर पडली. (प्रतिनिधी)दिरंगाईसाठी प्रशासनावरच खापर फोडले- स्थायी समितीच्या गेल्या तीन बैठकांत एकूण तीन हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर. मार्च ते आॅगस्टदरम्यान निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले प्रस्ताव प्रशासनाने आता समितीच्या पटलावर आणले आहेत. यासाठी शिवसेनेने प्रशासनाला जबाबदार ठरवत आपला बचाव केला होता. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत तब्बल ६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.