शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘रेशन’मध्ये वर्षाला ३000 कोटींची गळती

By admin | Updated: May 23, 2015 00:22 IST

गिरीष बापट यांची माहिती : बायोमेट्रिकद्वारे काळाबाजार थांबविणार : दारिद्र्यरेषेवरील लोकांनाही धान्य देणार

कोल्हापूर : रेशन धान्य वितरण व्यवस्थेतून वर्षाला ११००० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामधील तीन हजार कोटी रुपयांचे धान्य कोठे जाते, कोण घेऊन जाते याचा शोध लागलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती आहे. ती शोधून काढण्याचे काम सुरू आहे. या गळतीसाठी स्थानिक वाहतूकदार, ठेकेदार, दुकानदार, खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांमधील कोण दोषी आहे, त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अन्नसुरक्षा कायद्यामुळे राज्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) १ कोटी ७७ लाख शिधापत्रिकाधारकांचे दरमहाचे धान्य बंद केले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत वर्षाला होणाऱ्या तीन हजार कोटींच्या धान्याची गळती थांबल्यानंतर गरजू ‘एपीएल’धारकांनाही रेशनचे धान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, अन्नसुरक्षा कायद्यानुसार केवळ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांनाच रेशनचे धान्य देण्याची तरतूद आहे. मात्र, गेल्या शासनाने निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून १५०० कोटी रुपयांचे धान्य दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) धारकांना वाटप केले. अलीकडे ते बंद करण्यात आले आहे. परिणामी राज्यातील १ कोटी ७७ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले. धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक शिधापत्रिकेला आधारकार्ड लिंक केले जात आहे. त्यामुळे बोगस शिधापत्रिका सापडणार आहेत. काही दिवसांत राज्यात सर्वत्र बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे. सांगली जिल्ह्यातील बाराटक्के रेशन दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा सुरू केल्यामुळे महिन्याला एक हजार टन धान्य शिल्लक राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात सर्व दुकानांत ही यंत्रणा बसविल्यास धान्य किती शिल्लक राहते, हे नेमकेपणाने कळणार आहे. रेशन दुकानदारांना कमिशनही वाढवून दिले जाणार आहे. धान्य सुरक्षित राहावे, यासाठी राज्यात २५० नवीन शासकीय गोदामे बांधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक रॉकेल वाहतूक करणाऱ्या टँकरला ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रत्येक औषध दुकानात फार्मासिस्ट, फ्रिज, मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट कशी लावली जाते, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. गुटखाबंदीसाठी कायद्यात बदल करण्याचा विचार सुरू आहे.काळाबाजारवाल्यांना ‘मोक्का’गरीब, आदिवासी यांच्यासाठीच्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना ‘मोक्का’ लावणार आहे. शासकीय कर्मचारी व समाजातील जाणत्या लोकांनीही काळाबाजार करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, असे आवाहन मंत्री बापट यांनी केले. धान्य वितरणात काटेकोरपणा येण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव अशा टप्प्यांत तंत्रज्ञानाच्या वापरातून ‘द्वारपोहोच’ प्रणाली राबविण्यात येर्ईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिपद गेले तर बेहत्तर...नाशिक जिल्ह्यात रेशनचे ३२ हजार क्विंटल धान्य काळाबाजारात विक्री होताना उघडकीस आले. त्यातील चार दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केल्याने महसूल विभागातील काही संघटनांनी कामावर बहिष्कार, तसेच संप करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी असे काहीही करू नये. मंत्रिपद गेले तरी चालेल; मात्र भ्रष्टाचाराबाबत तडजोड करणार नाही, अस बापट यांनी सांगितले.