शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात देशभरात ३00 रेल्वे अपघात!

By admin | Updated: August 11, 2015 01:23 IST

गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी

अकोला : गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी लागलेली नुकसानभरपाई, यामुळे भारतीय रेल्वेला या कालावधित ९४५.५३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0११-१२ ते २0१४-१४ या चार वर्षांमध्ये देशभरात घडलेल्या रेल्वे अपघातांची माहिती रेल्वे प्रशासनाने संकलित केली आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेले अपघात, निकृष्ट स्लिपर्स आणि रुळांची निकृष्ट बांधणी (वेल्डिंग) या रेल्वे सुरक्षेला आव्हान देणाऱ्या तीन प्रमुख कारणांमुळे घडलेल्या अपघातांची दखल या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक कारणे आणि मानवी त्रुटी तसेच निकृष्ट झालेले रेल्वे पूल व रेल्वे उड्डाणपुलांमुळे घडलेल्या अपघातांचा यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटकांवर आणि रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या गंभीर अपघातांची नोंदही या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.सन २0११-१२ मध्ये ७७ गंभीर स्वरूपाचे रेल्वे अपघात घडले. त्यात ११५ जण मृत्युमुखी पडले, तर ५७४ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाला नुकसानभरपाईपोटी १४५.९४ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी १७४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0१२-१३मध्ये ६९ गंभीर अपघात घडले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८१ जणांच्या कुटुंबियांना व ३00 जण गंभीर जखमींना रेल्वेला १७0.३५ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागली. मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वेला १२९.१७ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २0१३-१४मध्ये देशभरात ७१ रेल्वे अपघात घडले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या ५४ जणांच्या कुटुंबियांना व ११९ गंभीर जखमींना ११.९३ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली, तर ७४.४१ कोटींचा आर्थिक फटका मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागला. सन २0१४-१५मध्ये देशात ८0 गंभीर रेल्वे अपघात घडले. त्यात १२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३३५ जण गंभीर जखमी झाले. या वर्षात रेल्वेला मृत आणि जखमींच्या नुकसानभरपाईपोटी १२३.११ कोटी मोजावे लागले. तर या अपघातांमध्ये झालेल्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी रेल्वेला ८१.९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.