शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३०० डॉक्टरांचे राजीनामास्त्र

By admin | Updated: July 2, 2014 00:56 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो) विविध मागण्यांना घेऊन मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज नागपूर जिल्ह्यातील

ग्रामीण आरोग्य सेवा ढासळली: मॅग्मो संघटनेचे बेमुदत आंदोलन नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो) विविध मागण्यांना घेऊन मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज नागपूर जिल्ह्यातील ३०० वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मॅग्मो संघटेनेच्या राज्यध्यक्षांकडे पाठविले. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी ग्रामीण आरोग्य सेवा ढासळली.सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीला घेऊन शासन अन्याय करीत आहे. केंद्र सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीला घेऊन मॅग्मो संघटनेने हे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनात राज्यातील १२ हजार तर नागपूर जिल्ह्यातील ३६५ वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर मॅग्मो संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद रक्षमवार आणि अध्यक्ष राजेश गायकवाड बेमुदत उपोषणावर बसले आहेत. ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी डॉक्टरांना सामूहिक राजीनामे द्यावे लागावेत, यावर जोरदार चर्चा सुरू होती. राजीनामे मुंबईकडे रवाना सदर येथील जिल्हा प्रशिक्षण पथकासमोर आज सकाळी १० वाजतापासून आंदोलनाला सुरुवात झाली. मॅग्मोचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे देण्यात आले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, राजीनाम्यावर ३०० डॉक्टरांनी स्वाक्षरी केल्या आहेत. राजीनाम्याची ही प्रत मुंबई येथे उपोषणाला बसलेले संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. गायकवाड आणि डॉ. रक्षमवार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या आंदोलनाला जिल्हा शल्य चिकित्सकांची संघटना, औषध निर्माता कर्मचारी संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. तेही आंदोलनात सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव हर्षवर्धन मानेकर, डॉ. हरीश महंत, डॉ. स्मिता उके, डॉ. सोनाली किरडे, डॉ. प्राजक्ता गुप्ता, डॉ. नरेंंद्र पटले, डॉ. अख्तर, डॉ. पारवेकर, डॉ. इंदूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)