शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

अनुकंपाच्या नोकरीसाठी ३० वर्षांपासून फरफट...

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

एका दलित कुटुंबाची परवड : पोलीस दलातील नोकरीसाठी शासनाच्या लालफितीच्या कारभाराचे चटके

जहाँगीर शेख - मुंबई=१९८५मध्ये पोलीस दलात सेवेत असताना काविळीने निधन झालेल्या बाळकृष्ण महादेव कांबळे या मुंबई पोलिसाचे कुटुंबीय अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी मिळावी म्हणून गेली ३० वर्षे शासनदरबारी उंबरठे झिजवत आहे. अज्ञान आणि सज्ञान वारस आणि अनुकंपा तत्त्वाखाली अर्ज करण्यासाठी झालेला एक वर्षाचा उशीर या नियमावलीमुळे एका गरीब दलित कुटुंबीयाची ही फरफट सुरू आहे. अगदी राष्ट्रपतींपर्यंतचा पत्रव्यवहार, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या भेटीगाठी होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. आता या कुटुंबाचे लक्ष नव्या सरकारकडे लागले आहे.बाळकृष्ण कांबळे हे मुंबई पोलीस म्हणून मुंबईतील गोरेगाव-तीन डोंगरी पोलीस चाळीत राहत होते. पत्नी अंबुताई आणि तीन मुली, दोन मुले असा परिवार होता. २८ जून १९८५ला त्यांचे निधन झाले. तेव्हा सर्व मुले १० वर्षांच्या आतील वयोगटातील होती. अंबुतार्इंनी मुले लहान असल्याने अनुकंपा तत्त्वाखाली स्वत:साठी नोकरीचा अर्ज केला. १६ जून १९८६ ला तत्कालीन पोलीस आयुक्तांनी लेखीपत्राद्वारे ‘मजदूर’या पदासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंद केल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांना प्रतीक्षाच करावी लागली. पाच लहान मुले घेऊन मुंबईत राहणे शक्य नसल्याने अंबुताई या करनूर (ता. कागल) येथे बहिणीकडे राहावयास आल्या, पण त्यांना पुढे मुंबईशी संपर्क साधता आला नाही. सर्वांत लहान मुलगा भीमराव याची २० पूर्ण झाल्यानंतर २१ जून २००३मध्ये त्याने अनुकंपा तत्त्वाखाली अर्ज केला. पोलीस आयुक्तालयातून उत्तर आले की, शासन नियमाप्रमाणे अज्ञान वारसापैकी एकाचे सज्ञान म्हणजे वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एक वर्षाच्या आत या योजनेखाली अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्ही एक वर्ष उशिरा अर्ज केल्याने नियमात बसत नाही. बी. ए. आणि संगणकीय शिक्षण झालेल्या भीमराव याने २००३ नंतर यासाठी पाठपुरावा सुरू केला. प्रत्यक्ष राष्ट्रपतींनाही पत्रव्यवहार केला. राष्ट्रपतींनी २५ जानेवारी २०१२ रोजी गृहविभागाला पत्र पाठवून याबद्दल विचारणा केली. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी भीमरावकडे कागदपत्रे मागून घेतली, पण पुढे काहीच प्रतिसाद आला नाही. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, सतेज पाटील यांनाही वारंवार भेटून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. आता हे कुटुंब नव्या भाजप सरकारकडे आशा लावून बसले आहे.काम होता होता सरकार बदलले...२७ मे २०१४ रोजी भीमरावने गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर मंत्री पाटील यांनी ‘अर्ज दाखल करण्याबाबत विलंब समाप्ती’ या सदराखाली स्वहस्तक्षरातील नव्याने अर्ज लिहिण्यास सांगितला, पण पुढे निवडणूक लागल्याने हे काम थांबले आणि आर. आर. पाटील यांचे निधनही झाले.कुटुंबाची फरफटमुंबईहून करनूर (ता. कागल) येथे नातेवाइकांच्याकडे येऊन राहिलेल्या या कुटुंबाची नोकरीअभावी फरफट झाली आहे. मोलमजुरी, दुसऱ्यांची शेती कसून कुटुंबाचा गाडा श्रीमती अंबुतार्इंनी हाकला आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभाराचे चटके एका दलित कुटुंबाला भोगावे लागले आहेत. आता नवे सरकार तरी लक्ष देणार काय? हाच खरा प्रश्न आहे.