शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात

By admin | Updated: September 20, 2016 06:24 IST

माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वाढता वापर करून गतिमानता आणायची आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात करायची असे नवे धोरण राज्य सरकार राबविणार आहे.

यदु जोशी,

मुंबई- माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वाढता वापर करून गतिमानता आणायची आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात करायची असे नवे धोरण राज्य सरकार राबविणार आहे. सातवा वेतन आयोग तोंडावर असतानाच राज्य सरकारने नोकरभरतीवर गदा आणल्याने बेरोजगारांच्या आशेवर पाणी फेरले आहे.राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी एक परिपत्रक काढून या कपातीचे स्पष्ट सूतोवाच केले आहे. प्रत्येक विभागाला आयटी सोल्यूशन्सच्या माध्यमातून एकूण मानव संसाधनांची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे. आयटी सल्लागार तसेच टीम त्यासाठी तयार करावी. तसे करणाऱ्या विभागांना इन्सेंटीव्ह देण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्त्व पाळणे आवश्यक आहे. सातव्या वेतन आयोगामुळे आगामी काळात वेतनावरील खर्चात होणारी संभाव्य वाढ, त्याचबरोबर १९८० ते १९९० या दशकात मोठ्या प्रमाणात झालेल्या नियुक्त्यांमुळे येत्या काही वर्षांत निवृत्तिवेतन देण्यासाठी मोठा आर्थिक भार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्य सचिवांनी नवीन भरतीची मागणी खाली आणण्यास सांगितले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची मागणी विविध संघटना करीत असताना आता सरकारने आहे त्या नोकऱ्यांमध्ये भविष्यात ३० टक्के कपात करण्याची भूमिका घेतली असल्याचे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. सध्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या १७ लाखांच्या घरात असून, सेवानिवृत्तांची संख्या ६ लाख इतकी आहे. >वेतन आयोगाचा भारसातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी अंदाजे १५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाकाठी 80 हजार कोटी रुपये खर्च होतात. निवृत्तिवेतनावर 20 हजार कोटी रुपये असे मिळून एकूण खर्च एक लाख कोटी रुपये इतका आहे.