शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या धरणात ३0 टक्केच पाणी

By admin | Updated: January 16, 2017 01:04 IST

वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे.

दावडी : वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे. एक महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक असून उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी असल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे.वाफगाव येथे वेळ नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे मातीचे धरण आहे. वाफगाव, वरुडे, पारगाव, गुळाणी या परिसराला धरणातील पाणी वरदान ठरले आहे. रब्बी हंगामात येथील शेतकरी कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. आॅगस्ट महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहात होते. वरुडे व वाफगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी धरणाच्या चारीवाटे पाणी सोडण्यात आले. तसेच धरणातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जानेवारी महिन्यातच धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असाच पाणी उपसा सुरु राहिल्यास महिन्याभरात या धरणात पाण्याचा थेंबही राहणार नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वाफगाव परिसरात पिण्याच्या पाण्यचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. (वार्ताहर)>गेल्या पाच वर्षांत प्रथमच जानेवारी महिन्यातच धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येणार नाहीत. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार आहेत उन्हाळ्याचे चार महिने कसे काढायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मासेमारी करणारा आदिवासी नागरिक हतबल झाला आहे.